पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुठपर्यंत आणि कसे त्याचे विविध परिणाम झाले इ.संदर्भात विश्लेषणात्मक अभ्यास करणे म्हणजे जेंडर विश्लेषण करणे होय.

• जेंडर डिस्किमेनेशन – भेदभाव करणे- एखादया व्यक्तीला पद्धतशीर पणे लिंगावर आधारित नावडतीची वागणूक देणे ज्यामुळे ती व्यक्ती तिचे अधिकार, संधी आणि संसाधनापासून वंचित राहते याला जेंडर डिस्किमिनेशन करणे किंवा भेदभाव करणे असे म्हणतात.

• मेनस्ट्मिंग करणे / मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे - जेंडर समानता समाजात यावी यासाठी जे त्या विषमतेत आहेत, ज्यांच्यामुळे ती विषमता निर्माण झाली किंवा जे त्या विषमतेचे वाहक आहेत हया सर्व घटकांबरोबर काम करणे म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे होय. उदा.स्त्रीयांवरचा अत्याचार थांबवायचा असेल तर स्त्रियांच्या बरोबरीने अत्याचार करणा-या पुरुषांबरोबरही काम करणे म्हणजेच त्यांना मुख्य प्रवाहात आणणे होय.

प्रकरण तिसरे

People response to GENDER

जेंडर संदर्भात लोकांचा प्रतिसाद

१. सहमती / संमती- समाजाने आपल्याला आपल्या लिंगाप्रमाणे जी काही भूमिका दिली आहे ती जशीच्या तशी स्विकारणे. उदाबाईच्या जातीने पायातल्या चपले सारखंच वागले पाहिजे, तेच तिचे काम आहे किंवा खानदानी स्त्रिया कधी पोलिस स्टेशनची पायरी चढणार नाही, असे डायलॉग या प्रकारच्या लोकांकडून ऐकायला मिळतात. अशा वागणा-या लोकांना समाजात फारच प्रतिष्ठा मिळते, पदोपदी त्यांचा गौरव होतो त्यामुळे त्यांना आपण फारच समाजातल महत्वाच काम करीत आहोत असं वाटतं ब-याचवेळा अज्ञानामुळे ही संमती असते. पिढयान पिढया सर्व लोक तसेच वागत असतात, त्यामुळे जास्त लोक जिथे, तेच करण्याची परंपरा दिसून येते.

२. नकार - समाजाने प्रत्येकाला वेगवेगळे नियम लावले आहेत हे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी त्याचा विचार केला आणि जेंडर निर्मितीच्या या प्रकियेला, भूमिकांना विरोध केला. उदासावित्रीबाई फुले यांनी जोपर्यंत मुलींसाठी शाळा सुरु करण्याची हिंमत केली नाही, तोपर्यंत मुलींना शिकविणे म्हणजे धर्म विरोधी कृती असाच नियम होता. म्हणजे सावित्रीबाईंनी समाजाच्या हया जेंडरच्या भूमिकेला नकार दिला. भगवान बुद्धा पासून ते सर्व संत, महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे सर्वच या परंपरेत मोडतात.

३. तडजोड - काहींना समाजाने दिलेली भूमिका, नियम मान्य नसतात. पण विरोध करण्यासाठी लागणारा वेळ, शक्ती, पैसा किंवा हिंमत त्यांच्याकडे नसते असे लोक तडजोड स्विकारतात उदा. ब-याच स्त्रियांना नोकरी करायची असते पण घरच्यांना ते


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....६