पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• बेंडर रोल/भूमिका- समाजाने प्रत्येक व्यक्तीला घालून दिलेली किंवा ठरवून दिलेली विविध कामे, जबाबदा-या आणि अपेक्षा म्हणजे त्या व्यक्तीची भूमिका. हया भूमिका हया जीवशास्त्रीय भूमिकेशी संबंधित असतीलच असे नाही. त्या वेळेनुसार, परिस्थितीनुसार बदलत असतात. उदा.देवीची पूजा करणारा पुजारी एका स्त्रीची पूजा करतो तर दुसरीकडे हाच पुरुष त्याच्या घरातल्या स्त्रीला मात्र मारतांना आपण पाहतो. म्हणजे एकच रुप पण भूमिका बदलली की त्याचा अर्थ बदलतो. रिप्रॉडक्टिव्ह रोल प्रॉडक्टिव्ह रोल कम्युनिटी मॅनेजमेंट रोल यात मूल जन्माला वस्तू आणि सेवा निर्मिती समाज चालवण्यासाठी घालण्यासंदर्भातली संदर्भातली भूमिका- आवश्यक असणा-या भूमिका श्रमावर आधारित काम भूमिका.शासन-प्रशासन- राजकारणातला सहभाग • जेंडर बॅलन्स- समाजात अशी आदर्श स्थिती, जिथं सर्व व्यक्ती एकजिनसी होऊन संधीची समानता आणि परस्परांच्या आदराचा आनंद घेतील म्हणजे त्या समाजात जेंडर बॅलन्स आहे अस आपण म्हणू शकतो. एकजीनसी म्हणजे कुठलाही जात, धर्म, वर्ण, प्रदेश, आर्थिक स्थिती, लिंग यावरुन भेद न राहता सर्व मानव म्हणून समान असतील. जेंडर बायस- - पूर्वग्रह– समाज जिवनात प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या जेंडर रोल मध्ये/भूमिकेत स्वतःला गुंतवतो. ती व्यक्ती त्या रोलमध्ये कशी गुंतली हे समजावून न घेता त्या व्यक्तीला एकाच दृष्टीकोनातून बघणे, आजमावणे म्हणजे आपण त्या व्यक्ती संदर्भात पूर्वग्रह दूषित आहोत असा अर्थ होतो. उदा. कुठलीही स्त्री समोर आली की, तिला स्वयंपाक, दागिने, कपडे हे विषय आवडतातच असे गृहित धरुन त्याच विषयावर बोलणे म्हणजे त्या व्यक्ती संदर्भात पूर्वग्रह दूषित असणे होय. •जेंडर स्टीरिओटाईप – समाजात प्रत्येकाला त्याच्या त्याच्या लिंगानुसार आखून दिलेली भूमिका, काम आणि जबाबदारी असते वर्षानुवर्ष अनेक पिढया जसे च्या तसे हया भूमिका, काम आणि जबाबदा-या करत राहिल्यामुळे जे वर्गीकरण/भाग/गट/ग्रुप बनतात ते गट म्हणजे जेंडर स्टिरिओटाईप होय. आपण प्रत्येक व्यक्तीला काहीही विचार न करता सरसकट त्या गटात मोजतो. उदा. मुस्लिम म्हंटले की आपल्यासमोर पठाणी ड्रेस येतो. बरेच मुस्लिम कधीच पठाणी ड्रेस घालत नाही तरी हया स्टिरिओटाईप मध्ये आपण त्यांना घालतो. स्त्रियांना साडी घालायला आवडतच असे आपण मानतो पण प्रत्यक्ष स्त्रियांना विचारले तर त्या नक्की सांगतील की साडी हा वस्त्र प्रकार आमच्यावर लादलेला आहे. • जेंडर अॅनालिसेस– विश्लेषण – जेंडरच्या रचनेमुळे प्रत्येक व्यक्तीचे जगणे, वागणे एका विशिष्ट (टाईप) प्रकारचे बनले आहे. ते असं का? कधी? कोणामुळे बनले? लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....५