पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिले जेंडर म्हणजे काय?
 प्रत्येक स्त्री पुरुष, मुलगा-मुलगी किंवा तृतीयपंथी म्हणजेच प्रत्येक जिवंत व्यक्तीने कसे वागावे, बोलावे, चालावे, जगावे, रहावे यासंदर्भात समाजाने प्रथा परंपरा द्वारा घालून दिलेल्या प्रत्येकाच्या सांस्कृतिक-सामाजिक भूमिका, जबाबदा-या, नातं, अपेक्षा आणि संधी यामुळे त्या व्यक्तीची होणारी मानसिकता म्हणजे जेंडर होय. जेंडर म्हणजे समाजाचा लिंगावर आधारित दृष्टीकोन किंवा असही म्हणता येईल की जेंडर म्हणजे त्या व्यक्तिची मानसिक स्थिती.

फरक स्पष्ट करा
जेंडर वेळ, जागा, प्रदेश, वर्ण, वर्ग, जात, धर्म, मार्केट, शासन, भाषेप्रमाणे जेंडर बदलतं म्हणून प्रत्येक व्यक्तीचे कपडे, बोलण्याची, वागण्याची पद्धत वेगवेगळी असते लिंग असते कुठेही, कधीही, कोणाचेही लिंग बदलत नाही. ऑपरेशन करुन लिंग बदलता येत असेल कदाचित पण तरी अंतर्गत त्यासंदर्भातल्या रचना मात्र बदलता येत नाही. म्हणजे पुरुषाचे लिंग बदलले तरी तो आई होऊ शकत नाही. स्त्रीचा पुरुष किंवा पुरुषाची स्त्री होत नाही. त्यामुळेच जगभर कुठेही जा स्त्री आणि पुरुष यांची शारिरीक रचना सारखी असते
ही एक मानवनिर्मित दीर्घ प्रक्रिया आहे जी सातत्याने मानवाच्या नकळत सुरु असते. लिंग हे जन्मतःच मिळते.स्त्री आणि पुरुष यातील फरक त्यामुळे स्पष्ट होतो.एकदाच मिळणारा अवयव

सेक्स आणि जेंडर हे समानार्थी शब्द आहेत का? प्रत्यक्षात हया दोन्हीही स्वतंत्र संकल्पना आहेत. जेंडर हा शब्द लिंगाशी संबंधित विषयावर बोलण्यासाठी सतत वापरला जातो त्यामुळे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत असे वाटते. लिंगानुसार वागणे ,बोलणे ठरत असल्यामुळे, भूमिका हया लिंगाबरोबरच बदलत असतात अस आपल्याला वाटते आणि म्हणून आपण हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरतो. खरतर प्रत्येक स्त्री ची स्त्री म्हणून भूमिका समाजाने ठरवून दिलेल्या जेंडरचीच असेल असे नाही. उदा. एखादया स्त्रीला मूल जन्माला घालायला आवडेल पण तिला धुणंभांडी करायला आवडेलच अस नाही. याचा अर्थ ती स्त्री आहे हे लिंग म्हणून खरे पण समाजाने ज्या जेंडरची (स्त्रीची ठरवून दिलेली कामे करणे) अपेक्षा तिच्याकडून केली आहे ते तिला आवडत नाही आणि समाजाचा निर्णय ती मानत नाही. लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३