पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुस्तकाविषयी...

जगप्रसिध्द स्त्रीवादी नाटककार एव्ह एन्सलरचे संशोधन सांगते की प्रत्येक चौथ्या स्त्रीने आयुष्यात एकदा तरी हिंसाचार अनुभवलेला असतो. अमर्त्य सेन म्हणतात सुविधांच्या अपूर्णतेमुळे सुरक्षित बाळंतपण झाल्यामुळे, कुपोषणामुळे, बाल लैंगिक अत्याचारामुळे, कौटुंबिक हिंसाचारामुळे, जातीय दंगलीमुळे किंवा युध्दामुळे दरवर्षी आपण 'शंभर करोड स्त्रिया गमावतो. बाई असल्यामुळे मारहाण होते हे सांगायला आपल्याला कोणाच्या अभ्यासाची काय गरज आहे. आपण जरा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले की हे लक्षात आल्यावाचून राहतच नाही. कुठलीही स्त्री वाचवणे आणि तिला सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करुन देणे ही प्रक्रिया आहे आणि त्यासाठी समाजातील सर्व समूह त्या दिशेने सक्रीय होणे अपेक्षित आहे. ह्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आधी ही प्रक्रिया काय आहे?

हिंसाचार म्हणजे काय? हा हिंसाचार लिंग भेदामुळे होतो तर हा लिंगभेद काय आहे? प्रत्येक व्यक्तीची यात भूमिका काय? हे सांगणे, शिकवणे खूपच गरजेचे आहे. म्हणून हा अनेक जणींच्या अनुभवातून आलेला अभ्यास आहे. ज्यांना ज्यांना समाजात लिंगभेद दूर होऊन सर्व प्रकारची समानता यावी असे वाटते अशा सर्वांसाठी हे पुस्तक आहे.

 हे अनेकांच्या चिंतनातून. अभ्यासातून तयार झालेले पुस्तक आहे. हे पुस्तक अंतिम आहे असे या अभ्यासात सहभागी झालेल्या कोणाचाच दावा नाही. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाची, प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. 'संगिनी' चा फ्ता पुस्तकात आहे. तेव्हा आठवणीने तुमचे मत, अभिप्राय नोंदवा

****

'जेन्डर आणि कौटुंबिक हिंसाचार ' हे पुस्तक छापावे असे ठरले तेव्हा पासून पहिला प्रश्न मनात आला याचे मुखपृष्ठ कसे असावे. त्यावर बरीच चर्चा झाली. नेहमीप्रमाणे गुगलला कामाला लावले. पण समजेसे काही मिळेना. सीमान दी बवायर यांनी मांडलेला सिध्दांत चित्रात कसा उतरवाव याचा विचार करीत असतांनाच आमची मैत्रीण अनुराधा शोभा भगवान नारकर हिने स्वतः बनविलेले चित्र फेसबुकवर अपलोड केले होते.हे चित्र पाहिले आणि एकदम वाटलं की एस्स...

 स्नेहा संस्थेने टाकावूतून टिकाऊ अशी स्पर्धा आयोजित केली होती. त्यात तिने हे चित्र बनवले होते. तिच्याकडे फक्त त्या चित्राचा फोटो होता. तिला विनंती केली आणि तिने परत हे इतक सुंदर चित्र ज्यात जन्माला व्यक्ती येते किंवा येतो त्याची बाई किंवा पुरुष समाज बनवतो हा सिध्दांत काठोकाठ भरला आहे. समाजात असलेली पुरुष प्रधानता ह्या चित्रात तिने इतकी छान दाखवली आहे. अनुचे खूप खूप आभार!..

****

लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२