पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कौटुंबिक हिंसाचार हया विषया संदर्भात काम करणा-या सर्व यंत्रणांनी एकाच दिशेने (तिला हिंसाचार मुक्त करण्यासाठीच्या दिशेने) एकाच प्रेरणेने आणि ताकदीने काम केले तरच त्याचा फायदा होईल, दिसेल. उदा. आपण बाईंना खूप तयार केले, हिंसाचार थांबवू

शकतो याचा विश्वास दिला आणि परत त्रास झाला तर पोलिस स्टेशनला जा म्हणून समजावले आणि प्रत्यक्ष स्त्रीला पोलिस स्टेशनला कोणी मदत केलीच नाहीतर तो मारणारा नव-यालाही थाक बसणार नाही आणि बाईंचा कॉनफिडन्सही वाढायचा नाही. त्यामुळेच संबंधित यंत्रणांमधील समन्वय हा अत्यत महत्वाचा आहे.

 १०. अनेक गोष्टींचा विचार एकाच वेळेस करणे- कौटुंबिक हिंसाचारातून बाहेर पडू इच्छिणा-या स्त्रीला मदत करतांना नाविन्यपूर्ण उपाय आणि एकाच वेळेस अनेक मार्गाने विचार करणे आवश्यक असते. जसे दवाखान्यात अचानक अपघात होऊन आलेलं पेशंट असेल, अपघात कसा झाला नेमकं कुठे लागले हे सांगण्याची पेशंटची अवस्था नसते तेव्हा उपचार करणारा डॉक्टर काय झाले असण्याची शक्यता वाटते अशा ब-याच गोष्टी विचार करून त्यानुसार उपचाराचे नियोजन करतो. प्रसंग कितीही अवघड, कठिण असेल तरि तो/ती डॉक्टर खचून जात नाही, ती भूमिका आपल्यालाही करायची असते.

 ११. प्रशिक्षण - कौटुंबिक हिंसाचार झाल्यानंतर त्या स्त्रीचे ज्या ज्या यंत्रणे संदर्भात संपर्क येईल, त्या त्या यंत्रणेला या विषयासंदर्भात संवेदनशिल बनवणे आवश्यक आहे. आपण आता जे समजावून घेतले ते सर्व या यंत्रणापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, त्यासाठी अंगणवाडी, वैद्यकिय सेवेत- नर्सेस, प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर्स इ., पोलिस इ.चे प्रशिक्षण आयोजत करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात समस्या निर्माण कशी झाली? का झाली? कोणी केली? त्यावर काय उपाय असू शकतो? हिंसाचाराचे परिणाम कसे समजावून घ्यायचे तसेच हे समजावून घेण्यासाठी त्या स्त्री बरोबर संवाद कसा असावा इ. विषय या प्रशिक्षणात असावे असे वाटते.

 १२. जनसंपर्क असलेले शासनाचे जे जे विभाग आहेत किंवा निमशासकिय कार्यालय, प्रकल्प आहेत त्यांना हिंसाचारातून बाहेर पडू इच्छिणा-यांना मदत करण्यासाठी असलेल्या यंत्रणांची माहिती पुरवली पाहिजे. उदाअंगणवाडी सेविका- मदतनीस यांना अशा केंद्रांची माहिती असेल तर त्यांचा मुलांच्या निमित्ताने गावाशी, घरातल्या महिलांशी संपर्क असतो त्यामुळे अशी हिंसाचारग्रस्त महिला असेल तर तिला त्या ही माहिती देऊ शकतील. यासाठी अंगणवाडी, पोलिस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा प्रकल्पांच्या, कार्यालयांच्या बैठकांना आपण नियमित गेले पाहिजे.लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....४१