पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिते किंवा सांगते तेव्हा शास्त्रषुद्ध पद्धतीने त्या समस्येचे छोटे छोटे भाग करून, ती स्वतः त्यावरचे उपाय शोधून ते अंमलात आणू शकते, ज्यामुळे आपण हिंसाचारातून बाहेर पडू शकतो यावरचा तिचा विश्वास वाढतो.

 या तिने दिलेल्या अर्जाला तिच्या आयुष्यात अत्यंत महत्त्व असते हे लक्षात ठेऊन आपणही ते महत्व जपले पाहिजे. तिने तिच्या आयुष्याचे सर्वात महत्त्वाचे, सिकेट आपल्याकडे त्या अर्जाच्या निमित्ताने दिलेले असते. तिची व्यक्ती म्हणून प्रायव्हसी राखण्यासाठी तो अर्ज योग्य त्या ठिकाणी जपून ठेवला पाहिजे. ती काही स्टोरी नाही की कोणीही या आणि टाईमपास म्हणून वाचत बसा. अर्ज कधीही, कुठल्याही संदर्भात आवश्यक असू शकतो म्हणून त्याचे फाईलिंग, त्यावरच्या नोंदी म्हणजे नंबर इ. तितकेच महत्त्वाचे आहे.

 ५. पूर्वग्रह नको - हिंसाचारग्रस्त व्यक्ती किंवा अत्याचार करणारी व्यक्ती या दोन्हींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह असता कामा नये. नाहीतर आपण कोणालाच समजावून घेऊ शकत नाही याअर्थाने न्याय देऊ शकत नाही. उदा. मला माहित आहे हया बाई भांडकुदळच आहे, यांनीच नव-या बरोबर भांडण सुरू केले असेल किंवा हया पुरुषाला मी ओळखते, तो खूप हुषार आणि सर्वांना समजावून घेणारा आहे, तो असा बायकोला मारूच शकत नाही किंवा कुठल्याही स्त्रीचा लैंगिक छळ करू शकत नाही.

 ६. नॉन जजमेंटल अॅटिटयूड - म्हणजे कुठलाही अर्ज वाचताना, कोणाच ऐकत असताना किंवा दोन लोकांची एकत्र बैठक घेत असतांना सांगणा-यांना विचार करायला भाग पाडायचे असते आपण त्यांना न्यायाधीशांसारखे निकाल-आदेश द्यायचे नसतात.

 ७. सोशलवर्क डिग्रीचे शिक्षण घेतांना आपण समाजकार्याचे जे जे तत्व शिकलो ते सर्व डोळया समोर ठेवून अंमलात आणले की आपण ब-यापैकी स्त्रीच्या मनात आपल्याबद्दल 'आपण योग्य ठिकाणी आलो आहोत' हा विश्वास निर्माण करू शकतो.

 ८. पूर्वतयारी - हिंसाचारग्रस्त व्यक्ती आपल्याकडून जेव्हा परत जाते तेव्हा लगेच किंवा काही काळाने तिच्यावर हिंसाचार परत होऊ शकतो हे लक्षात घेऊन अशी घटना परत घडेल तेव्हा त्या स्त्रीने काय काय करावे यासाठीची तिची पूर्वतयारी करून घेणे आवश्यक असते. उदा. मार कसा चुकवावा, पटकन पोलिस स्टेशनला किंवा आपल्याला कसे कळवावे, तिचे/मुलांचे आवश्यक पेपर्स योग्य ठिकाणी कसे ठेवावेत इ. गोष्टींची तिला माहिती द्यावी. शेजारच्यांकडे पोलिस स्टेशनचा किंवा आपल्या केंद्राचा नंबर ठेऊन जेव्हा तिला हिंसेतून सुटणे शक्य नसेल तेव्हा आपल्याला कळवायला सांगणे.

 ९. सर्वांगाने विचार करणे - कौटुंबिक हिंसाचार हा अनेक हात-पाय-डोके असलेला अजब विषय आहे. त्यामुळेच हिंसाचारात असलेलया स्त्रीया पटकन हताश होतात कारण त्या एक समस्या सोडवितात तोपर्यंत दुसरी त्यांच्या पुढे आलेलीच असते हे आपण आता

अनुभवातून, अभ्यासातून शिकलो आहोत, त्यामुळे त्यावरच्या उपायांचा विचारही असाच सर्वांगानी करायला हवा. कुठल्याही स्त्रीला हया अत्याचारातून बाहेर पडायचे असेल तेव्हा


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....४०