पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्था परिचय

संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक ही नोंदणीकृत सामाजिक संस्था गेली १८-१९ वर्ष नाशिक जिल्हा परिसरात निरोगी, आनंदी, सर्व प्रकारच्या समानतेवर आधारित असलेल्या समाज निर्माण व्हावा यासाठी सक्रीय काम करीत आहे. नाशिक शहरातल्या राहुलवाडी नावाच्या नावाच्या एका मोठ्या झोपडपट्टीत जन्मलेल्या सात मुलींनी मिळून सुरु केलेली ही संस्था स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबावे यासाठी स्वतःला कटीबध्द करते आहे.

  हिंसाचार मुक्त समाज निर्माण होऊ शकतो यावर आमचा विश्वास आहे म्हणूनच आम्ही त्यासाठी हा प्रवास सुरु केला आहे. सावित्रीमाई फुले यांचे पासून स्त्री शिक्षणाचा सुरु झालेला लढा पुढे न्यावा असे आम्हांला वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गुरुंचा हा लढा पुढे नेला आणि त्याला भारताच्या संविधानाचे अधिष्ठान दिले ज्यामुळे स्त्रिया आता अधिक सक्षम झाल्या आहेत. स्त्रियांवर होणारे विविध अत्याचार कसे हाताळायचे यावरचे अनेक मार्ग आता स्त्रिया घेतांना दिसतात. त्याप्रमाणात पुरुष मात्र ह्या समानतेवर आधारित समाजासाठी पुरता तयार झालेला नाही असा आमचा फिल्ड वरचा अनुभव सांगतो आणि म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचार ह्या विषयावर 'पुरुषां सोबत काम करण्याचे आम्ही निश्चित केले आणि त्या दिशेने आमच्या प्रवासाला सुरुवात केली.

 पुरुषांचाजुलमी स्वभाव किंवा स्त्रियांचा अत्याचार सहन करण्याचा स्वभाव हा जन्मताच नसून उपलब्ध समाजातील लिंग विषमतेमुळे तो असा बनला आहे हे आता अनेक अभ्यासाने सिध्द झाले आहे आणि याच अभ्यासांनी हे ही सिध्द केले आहे की विविध प्रकारच्या प्रशिक्षणाने 'मानवात बदल होतो. म्हणूनच 'संगिनी ने पुरुषां सोबत काम करण्याचे ठरिवले आहे. मग ती संधी शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांबरोबर घ्यावयाचे 'मासिक पाळी' ही सत्र असो की अकरावी-बारावी च्या विद्यार्थ्यांबरोबर घ्यावयाचे 'जेंडर आणि हिंसाचार ह्या विषयावरील सत्र असो हे सर्व ह्या कामाचा भागच असेल.'मैत्र कारवाँ सारख्या अभिनयातून लिंग समानता असू शकते, तुम्ही कुठल्याही लिंगाचे असाल, तुमची मानसिकता काहीही असेल तरी ती मानसिकता तुम्ही व्यक्त करु शकता आणि सन्मानाने जगू शकता हा विश्वास देण्याचा प्रयत्न सुरु आहेत. असे अनेक कार्यक्रम करु इच्छिणारी 'संगिनी अनेकांचा सहभाग यात मिळिवण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. तुमच्या कडे जे काही जास्त असेल- वेळ, पैसा, ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान किंवा श्रम 'संगिनी'च्या द्वारा समाजाला द्या असे आवाहन

यानिमित्त आम्ही करीत आहोत.


****