पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपण लक्षात घेतले पाहिजे. लहानपणापासून पुरुषांबद्दलची भिती मनात घालायची, तिला पुरेसे अन्न न देता अशक्त बनवायचे, मासिक पाळी सारख्या नैसर्गिक चक्काबद्दल गैरसमज तिच्या डोक्यात घालून स्त्रीयांना शारीरिक-मानसिक-भावनिक कमकुवत ठेवायचे आणि मग तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गैरसमज पसरवयाचे ही निती थांबवायची असेल तर स्त्रीयांना सर्व प्रकारचे शिक्षण, पुरेसे अन्न आणि व्यायाम आवश्यक आहे याचा प्रचार-प्रसार आपण केला पाहिजे. म्हणूनच स्त्रीवादी कवियत्री वरील गाण्यात शेवटी म्हणते

"बदलाया बंड मी करिते,
स्त्री दास्याचा तुरूंग फोडिते।।"

 ३. "दिवसभर बायकोशी कसही वागलं तरी चालतं, रात्री तिला जवळ घेतल की, ती सर्व माफ करते." - हा एक मोठा हिंसेबद्दलचा गैरसमज आहे. दिवसभर तिचा अपमान करायचा, तिला मारायचे मग रात्री ती शारीरिक संबंध आनंदाने कशी करणार? याची जाणिव बायकोला मारणा-यांना व्यवस्थित आहे आणि म्हणूनच त्यांनी हा गैरसमज पसरवलेला आहे. टाय सामाजिक विज्ञान संस्थानच्या डॉ.निशी मित्रा यांनी त्यांच्या 'स्त्रीयांवरिल विवाहांतर्गत होणारे बलात्कार' या संशोधनाच्या वेळी जेव्हा स्त्रियांना वरील वाक्य सांगितले तेव्हा एकाही स्त्रीने या वाक्याचे समर्थन केले नाही. दिवसभर त्रास भोगूनही रात्री शारीरिक संबंधांना स्त्रीया तयार झाल्या नाही तर "तुझे कोणाशी काही असेल म्हणून मला हात लावू देत नाही." "कोणासाठी सांभाळून ठेवते." असे आरोप केले जातात, ते आरोप होऊ नये म्हणून स्त्रिया होणा-या शारीरिक अत्याचाराला थांबवण्या ऐवजी ती वेळ मारून नेण्यासाठी तटस्थ पडून राहतात असे अनुभव स्त्रियांनी या संशोधनाच्या मुलाखतीच्या वेळेस सांगितले.

 ४. हिंसेचा स्त्रीयांना राग नसतो, म्हणून तर त्या नव-याबरोबर एवढा मार खावूनही राहतात - मार खाल्ल्यानंतर, सर्व प्रकारचा त्रास होऊनही स्त्रीया घर सोडत नाही हे दिसणारं दृष्य खर आहे, पण त्यामागे त्यांना ती हिंसा आवडते किंवा त्यांनी हिंसा करणा-यांना माफ केले आहे असे नाही, तर त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. स्वतःच पुरेस शिक्षण नाही की ज्याच्या बळावर त्या उत्पन्न मिळवू शकतील, माहेरी आधार नसतो, माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, मुलं बरोबर असतात, त्यांना घेऊन कुठे जाणार? काय खाऊ घालणार? त्यांच शिक्षण कसे करणार? हे आणि असे अनेक प्रश्न तिच्या समोर आ वासून उभे असतात; या प्रश्नांना सामोरे कसे जायचे याचा विषय कधीच आयुष्यात एकेलेला नसतो, याआधी घरातली कोणी स्त्री सासरच्या जाचाला कंटाळून

माहेरी परत आली असेल तर तिचे हाल पाहिलेले असतात. त्यामुळे कितीही त्रास झाला तरि खानदानीच्या इज्जतीसाठी ती तिथेच राहणे पसंत करते. हिंसाचारग्रस्त महिलांच्या तात्पुरत्या निवासासाठी ज्या शासकिय, निमशासकिय किंवा खाजगी संस्थांच्या व्यवस्था आहेत त्या फारच वाईट अवस्थेत आहेत. नव-याचा मार वाचवण्यासाठी बाई या


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३६