पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुलनेत स्त्रीयांची कमी झालेली संख्या हा सामाजिक दृष्टया हिंसाचाराचा मोठा परिणाम आहे.

 २. स्त्रीया हिंसाचारात अडकल्यामुळे त्या देशाच्या विकास प्रक्रियेतून बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यामुळे देशाचा विकास दरही कमी कमी होतो आहे. नागपूरच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाने 'हिंसाचारामुळे देशाचे होणारे आर्थिक नुकसान' याचा अभ्यास मांडला आहे. त्यांच्या मते जेव्हा एका बाईला मारहाण होते तेव्हा पोलिस, कोर्ट, तिच्यावर उपचार करणारी यंत्रणा, त्या बातम्या छापल्या गेल्यामुळे मिडियातली जागा आणि लोकांचे होणारे डायव्हरशन, तसेच जो पुरुष मारहाण करतो त्याचे कामावर लक्ष लागत नाही म्हणजेच त्याची उत्पादकता घटते, मारहाणीमुळे बाई जखमी झाल्या असतील किंवा मानसिकदृष्टया डिस्टर्ब झाल्या असतील त्यामुळे त्यांचेही कामावर लक्ष लागत नाही म्हणजे त्यांचीही उत्पादकता कमी होते यासर्व गोष्टी खर्ची पडतात. स्त्रीयांना मारहाण झाली नाही तर वरिल सर्व यंत्रणा आपापली कामे करू शकतात शिवाय शासनाचे पैसेही वाचतील.

 ३. महिलांवरिल हिंसाचार हा फक्त त्या स्त्रीवर झालेला हिंसाचार नसून भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला शांततेने जिवन जगण्याचा अधिकार दिला आहे, हया अधिकाराच कोणी उल्लंघन करित असेल तर त्यांना त्यापासून रोखण्यासाठीची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर तसेच शासनावर टाकली आहे, त्यामुळे स्त्रीयांवर होणारा हिंसाचार हा त्या शासनाचा, पोलिसांचा आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान आहे.

प्रकरण पाचवे
हिंसेबाबतचे गैरसमज

 हिंसेबाबत अनेक गैरसमज आपल्या समाजात दिसून येतात काही वेळेस ते गैरसमज इतके आपल्या अंगवळणी पडतात की ते नैसर्गिक आहेत असेच आपल्याला वाटते. सर्वच गैरसमज या प्रकरणात आले असतील असे नाही. उदाहरणादाखल काही गैरसमज खाली दिले आहेत. कार्यकत्यांनी आपल्या रोजच्या अनुभवातून ही यादी वाढवत न्यावी अशी अपेक्षा आहे.

हिंसेबाबतचे गैरसमज :-

 १. किरकोळ मारहाण बाईला आवडते - "बाई, तिला आवडत मारलेले, त्याशिवाय तिला जेवणच जात नाही किंवा झोपच येत नाही." हा डायलॉग तर आपण दिवसातून दहावेळा तरी ऐकत असतो. मार खाणा-या अनेक बायकांना मी हा प्रश्न विचारला, पण एकीचेही होकारार्थी उत्तर आले नाही. पण मग हा डॉयलॉग कुठून, कसा आला आणि कसा टिकला. तर जे स्त्रीयांना ताब्यातच ठेवले पाहिजे अशा मानसिकतेचे लोक आहेत त्यांनी हा गैरसमज निर्माण केला आहे, सतत म्हणत म्हणत त्याचा प्रचार-प्रसारही केला आहे. कुठल्याही स्त्रीवर उठलेला पहिला हात किंवा फटका याने तिच्या मनात रागच उत्पन्न झालेला दिसतो. तिला स्वतःचा अपमान वाटलेला असतो. त्याची तीव्रता कमी


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३४