पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४. आर्थिक परिणाम-

 १. हातातले पैसे जाणे.

 २. नोकरी जाणे.)

 ३. काही दिवस त्या स्त्रीने काम केलेले असते, नवरा नंतर कामावर जाऊ देत नाही, ज्यामुळे. तिने जितके दिवस काम केले त्याचे पैसेही मिळत नाही आणि तिची कामावरची सिनॅरिटीही जाते. कामावर सातत्य नाही म्हणून तिच्यावरचा विश्वास उडतो आणि पुढे ती त्या कामातली कितीही तज्ञ असली तरी तिला ते काम मिळत नाही.

५. लैंगिक परिणाम-

 १. लैंगिक अवयवांना तात्पुरती/ कायमस्वरूपी जखम होणे.

 २. लैंगिक संबंधाबाबत भिती बसणे.

 ३. लैंगिक संबंध करण्याचा आत्मविश्वास गमावणे.

 ४. एचआयव्ही, एडस, गुप्तरोगा सारख्या रोगांची लागण होणे.

 वरील परिणाम हे उदाहरणा दाखल आहेत. आपल्याकडे येणारी स्त्री ही स्वतंत्र आहे, त्यामुळे तिच्यावर झालेला हिंसाचार हा प्रत्येकी वेगळा असू शकतो तसेच त्याचे परिणामही प्रत्येकीचे वेगळे असू शकतात. त्या स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक जडणघडण कशी झाली आहे यावर हिंसाचाराचे परिणाम अवलंबून असतात. एखादया स्त्रीला 'मारले याचे काही नाही, पण आईवर शिवी कशाला द्यायची' अस वाटेल तर एखादी, 'त्याच तोंड आहे किती का शिव्या देईना, पण अंगावर हात कशाला करायचा?' असे म्हणेल. एखादी स्त्री

मारहाणीमुळे तिची काय अवस्था झाली हे इतरानांही समजावी, मारहाण किती गंभीर झाली याचा अंदाज सबंधितांना यावा यासाठी आहे त्या मारहाणीच्या स्थितीत तशीच आपल्याकडे किंवा पोलिस स्टेशनमध्ये येऊ शकते. त्या मागची तिची भावना समजावून घेतली पाहिजे.

 घरी त्यांना कोणी बोलू देत नाही, त्यांच्या प्रत्येक म्हणण्याची टिंगल केली जाते किंवा अपमान केला जातो. आपणही तिची दखल घेतली नाही, तिची टिंगल केली, 'ओरडून बोलू नकोस गं,' 'बास आता कळल मला तुला किती मारलं आहे ते' किंवा 'धरी अशीच आरडाओरड करीत असशील, मग मार पडेल नाही तर काय होणार?' असे सगळे डायलॉग ऐकल्यावर त्या स्त्रीला हताश वाटणे साहजिक आहे. सगळयाच यंत्रणा अशाच वागल्या तर त्या स्त्रीने जायचं कुठे?

सामाजिक परिणाम – कौटुंबिक हिंसाचार हा जरी घरगुती प्रश्न आहे असे वाटत असले तरी खरतर तो सार्वजनिकच प्रश्न आहे, त्यामुळे त्याचे समाजावरही परिणाम झालेले दिसतात, ते पुढिलप्रमाणे :-

 १. मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भपात करण्याचे प्रमाण वाढते आहे. पुरुषांच्या


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३३