पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८. मृत्यू होणे ७. सतत उपासमारीमुळे भूक न लागणे, कुपोषणामुळे अषक्तपणा, इतरही आजार बळावणे. १९ ते ३५ वयोगटातल्या स्त्रीयांच्या मृत्यूदरात नैसर्गिक मृत्यूपेक्षा कौटुंबिक हिंसाचारामुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. २. मानसिक परिणाम १. मानसिक अपंगत्व येणे. २. मानसिक संतुलन बिघडणे- अशा व्यक्ती सतत बोलतात, असंबंध्द बोलतात, मध्येच हसतात तर मध्येच रडतात. ३. आत्मविष्वास गमावणे- अशा व्यक्ती जेव्हा बोलत असतात तेव्हा ऐकणा-याकडे न पाहता इतरत्र पाहतात, कुठेही एकटं जाण्याची हिंमत नसते, नियमित करत असलेली कामेही नंतर करू शकत नाही. ४. मानसिक रूग्ण होतात - अंगात येणे, गर्दीला घाबरणे, बोलताना सतत घसा-ओठ-जीभ कोरडी पडणे इ. ५. सतत आजारी - मानसिक शांतता नसल्यामुळे अशा व्यक्ती सतत आजारी पडतात औषधोपचार करूनही किरकोळ वाटणारे आजारही त्यांचे बरे होत नाही. सततच्या हिंसाचारामुळे सतत पाठदुःखी, कंबरदुःखी हे तर स्त्रीयांमध्ये सहज आढळणारे परिणाम आहे. ६. सतत भिती-जरा आवाज झाला तरी अशा व्यक्ती लगेच घाबरतात. ७. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार स्त्रीयांच्या आयुष्यात ऐन तारुण्यातले (१५ ते ४४ वयातले) ५ ते ७ वर्षे है हिंसाचाराला तोंड देण्यात जातात. त्यामुळे पुढे जगण्याची उम्मीदच संपते. पुढचे आयुष्य त्या हिंसाचारामुळे झालेले परिणाम निस्तरण्यात किंवा परत हिंसाचार होणार नाही ना हया भितीत जातात. ८. व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात. मार खाणा-या स्त्रीवर नंतर परिणाम होतो पण मारणा-या पुरुषावर मात्र आधीच परिणाम सुरू झालेला असतो, त्यामुळेच ते मारायला तयार होतात. या त्यांच्या मानसिक कमकुवत पणामुळे मग ते व्यसन दारूच, जुगाराचे असेल त्यात अडकत जातात. तसेच स्त्रीयांवरही याचा परिणाम होतो त्या तासन्तास मशेरीने दात घासतात किंवा तंबाखू खातात ३.शाब्दिक/भावनिक परिणाम - ज्या स्त्रीला सतत अश्लील शब्द वापरून तिचा अपमान होत असेल तर कालांतराने तिचीही संवेदनशिलता संपते आणि मग तीही तेच शब्द वापरते किंवा त्या शब्दांसंदर्भात एवढी घृणा बसते की दुस-याने कोणी तसे शब्द वापरले तरी ऐकणा-या स्त्रीला शिसारी येते, मळमळ होते. लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३२