पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येणाऱ्या घटना ह्या दोन पुरुषांमध्ये घडल्या किंवा कुंटुंब सोडून दोन कामगारांमध्ये, दोन शेजाऱ्यांमध्ये इतर ठिकाणी घडल्या तर कायद्याने त्याला गुन्हा मानून त्याची नोंद करण्याची तरतूद केली आहे.

 वरील सर्व व्याख्यांचा अर्थ आहे की, स्त्रीला कोणीही कुठल्याही कारणाने, नात्याने मारहाण, कुठलाही हिंसाचार कायद्याने करु शकत नाही. तसे झाल्यास किंवा होण्याची शक्यता तिला वाटत असेल तर ती संबधित यंत्रणेकडे न्याय/मदत मागू शकते. तिला न्याय/मदत देणे हे त्या यंत्रणेचे आद्य कर्तव्य आहे. नुकत्याच पास झालेल्या कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्यानुसार अर्जदार स्त्री ही त्या व्यक्तीची बायको असण्याची आवश्यकता नाही. कोणीही स्त्री तिच्यावर होणाऱ्या अत्याचार संदर्भात संबंधित यंत्रणेकडे स्त्री तिच्यावर होणा-या अत्याचार संदर्भात संबंधित यंत्रणेकडे तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विरुध्द तक्रार/अर्ज देऊ शकते.

प्रकरण तिसरे
कौटुंबिक हिंसाचारचे प्रकार

कौटुंबिक हिंसाचारा पासून महिलांचे संरक्षण करणारा कायदा 2005 मध्ये येण्यापूर्वी न्याय मागण्यासाठी आलेल्या महिलेवर अन्याय झालेला आहे हे संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देईपर्यंत त्या स्त्रीचा किंवा तिच्या बरोबर आलेल्यांचा श्रम, वेळ, पैसा जायचा. जोपर्यंत अर्जदार स्त्रीच्या अंगावर रक्त दिसत नाही, जबरदस्त मुका मार दिसत नाही किंवा त्या हिंसाचाराच्या गंभीर परिणामाने ती स्त्री पूर्णतः संपून जात नाही तोपर्यंत तिच्यावर अन्याय झाला आहे हे मान्य करायलाच ही यंत्रणा तयार नसते. पण आता या कायद्याने हिंसाचाराची व्याख्या आणि प्रकार याची सविस्तर माहिती देऊन त्या व्यतिरिक्तही अत्याचार असू शकतो असे म्हंटल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या व्यापक झाली आहे. स्त्रीयांवर होणा-या हिंसाचारात काही पुरूष काहीही कारणांवरून मारतात तर काही पुरूष तिची चूक झाली होती म्हणून मारले असे

सांगतात. काहीही कारणाने झालेला हिंसाचार हा हिंसाचारच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. तिची चूक झाली हे ठरवायचे कोणी, तर पुरूषाने हा कुठला न्याय? आणि समजा चूक झाली तरि शिक्षा देण्याचा अधिकार पुरूषाला दिला कोणी? पुरूष चुकला तर बायको मारते का?

साधारणपणे खालीलप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार पडतात-

१. शारीरिक हिंसाचार- उदा. मारणे, चापट मारणे, ठोसा मारणे, चावणे, लाथ मारणे, चिमटा काढणे, ढकलणे (जोराचा धक्का मारणे) लोटणे किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक वेदना देणे किंवा इजा करणे

२. लैंगिक हिंसाचार- उदा. बळजबरीने शारीरिक संभोग करणे, बळजबरीने अश्लील लेखन किंवा इतर बिभत्स साहित्य बघण्यास लावणे, त्या स्त्रीची अप्रतिष्ठा


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२९