पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समावेश केला आहे.

 १. इंग्लंडच्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी असलेल्या न्यायालयाच्या मार्गदर्शक आणि मदत करणाऱ्या यंत्रणेने तयार केलेली व्याख्या. त्यांच्याकडे 'कौटुंबिक हिंसाचार विरोधी धोरण आहे त्यात ही व्याख्या दिलेली आहे

"आपल्या सत्तेच्या आणि नियंत्रणाच्या ताकदीचा गैरवापर करुन आपल्या जवळच्या व्यक्तींच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीने शारीरिक, लैंगिक, भावनिक, मानसिक कुठलेही कृत्य केले ज्यामुळे त्या नात्यातील मुलं, कोणतीही एक व्यक्ती, पूर्ण कुटुंब किंवा समाजावर विपरित परिणाम होतो अशा कृत्याला ज्यात धमकी देणे, त्रास देणे, संपत्तीचे नुकसान करणे, आर्थिक नुकसान किंवा आणि तशी भिती तयार करणे याचा समावेश होतो. त्याला कौटुंबिक हिंसाचार समजले जाते."

 २. एखाद्या स्त्रीला तिच्या कुंटुंबातील कोणीही ती स्त्री म्हणून तिच्या स्वातंत्र्यावर, आदरावर, निर्णय घेण्याच्या कुवतीवर गदा आणण्यासाठी केलेले कुठलेही कृत्य म्हणजे कौटुंबिक हिंसाचार होय. त्यासाठी त्यांनी जी न्यायालये सुरु केली त्याचे नाव 'स्त्रीयां वरील हिंसाचार विरुध्दचे कोर्ट असेच दिले आहे. मारणारा पुरुष हा निष्पाप हे गृहितच

मानले जात नाही. दोघांचे आमने सामने जाबजबाब होण्यापूर्वी हे कोर्ट त्या स्त्रीला बंद कोर्टात ऐकून घेऊन सक्षम करतात आणि त्या अत्याचार करणाऱ्या पुरुषाला संबंधित घरातून बाहेर काढले जाते; त्याचे पालक म्हणून असलेले मुलांची कस्टडी किंवा त्यांना भेटण्याचे अधिकार रद्द करतात. त्याचा शस्त्र परवाना रद्द केला जातो, नाकारला जातो.

 ३. भारतीय राज्यघटना : ४९८ कलमासाठी केलेली व्याख्या - कुठल्याही विवाहीत स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून कुठलाही शारीरिक, मानसिक क्रूर वर्तणूक झाल्यास त्याला 'कौटुंबिक हिंसाचार म्हणून दाखल केले जाईल.

 ४. कौटुंबिक हिंसाचार पासून महिलांचे संरक्षण करणारा कायदा, २००५ - या कायद्यात कलम ३ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार 'प्रतिपक्षाची कोणतीही कृती, वागणूक, क्रिया किंवा वगळणूक ही काही निश्चित परिस्थितीमध्ये कौटुंबिक हिंसाचार समजण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ शारीरिक व मानसिक गैरवर्तणूक नसून, शाब्दिक, भावनिक, लैंगिक किंवा आर्थिक गैरवर्तणूकीचा समावेशही त्यात करण्यात आलं आहे.

 ५.लिंगावर आधारित हिंसाचार-Gender based violence - लियांचे समाजात असेलेले दुय्यम स्थान यामुळे हिंसाचार होत असल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराला 'लिंगभेदावर आधारित हिंसाचार' असेही म्हटले जाते. या हिंसाचारात


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२८