पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेण्यासाठी का येत नाही? मुलीच्या मृत्यूनंतर मारणाऱ्यांला शिक्षा व्हावी म्हणून झगडणारे पालक जेव्हा मुलगी त्रासाबद्दल सांगत असते तेव्हाच का तिला मदत करत नाही, तेव्हाच त्या मारणाऱ्यांच्या तावडीतून तिला सोडवत का नाही? हे सर्व प्रश्न आपल्याला यात समजावून घ्यायचे आहेत.

हिंसेची मानसिकता

हिंसा करणे किंवा सहन करणे ही एक मानसिकता आहे. या मानसिकतेला खतपाणी घालणारी परिस्थिती मिळाली की हिंसा घडते. नवरा दरवेळेस किंवा प्रत्येक नवरा सशक्त असतो म्हणून मारतो हे पूर्णतः खरे नाही. बायकोला मारण्याची त्याची मानसिकता असते आणि शरीराने ती अशक्त असते म्हणून नवऱ्याला हिंसाचार करणे सहज जमते. आपण आपल्या कामात अनेक वेळा पाहिले असेल की नवरा बारिक, बुटका किंवा अशक्त असते म्हणून नवऱ्याला हिंसाचार करणे सहज जमते. आपण आपल्या कामात अनेक वेळा पाहिले असेल की नवरा बारीक, बुटका किंवा अशक्त आणि बायको त्याच्यापेक्षा सशक्त, उंच असूनही तो नवरा तिला मारतो. आपण अशा स्त्रियांना जर विचारलं की, तुम्ही असा मार का खाता, हात का घरत नाही? तर त्या म्हणतात, "बाई,नवऱ्याचा हात कसा धरणार?"

  एखादा नवरा बायकोला मारत नसेल तर त्याचे घरचे, तिच्या घरचे, आजूबाजूचे सर्वच कौतुकाने सांगतात की, तो कधीच बायकोला मारत नाही. यात विशेष काय आहे? बायकोला मारायचे नसतेच. पण बरेच नवरे मारत असल्यामुळे जे मारत नाही त्यांचे बरेच कौतुक होते. याचाच अर्थ हिंसा ही मानसिकता आहे.

  जे पुरुष दुसऱ्यांना मारत नाही याचा अर्थ ते सशक्त नाही म्हणून मारत नाहीत असे नाही तर ते हिंसेच्या विरोधात आहेत म्हणून मारत नाहीत. शारीरिक क्षमता असूनही जी व्यक्ती दुसयांवर हिंसाचार करीत नाही ती खऱ्या अर्थाने अहिंसावादी असे महात्मा गांधी म्हणत. यासावरुन एकच गोष्ट लक्षात येते की हिंसा करणे आणि सहन करणे ही मानसिकता आहे

 

प्रकरण दुसरे
कौटुंबिक हिंसाचार - व्याख्या

व्याख्या - कौटुंबिक हिंसाचारालाच 'सर्वात जवळच्या व्यक्तीकडून होणारा हिंसाचार' असेही म्हंटले जाते, कौटुंबिक हिंसाचार ही एक व्यापक संकल्पना आहे. काही देशांमध्ये यात मुलांवर होणारा, वृध्दांवर होणारा तसेच कुटंबातल्या इतर सदस्यांवर होणारा हिंसाचारही समाविष्ट केलेला आहे. कौटुंबिक हिंसाचारामध्ये पत्नीला होणारी मारहाण, तिचा मानसिक छळ, तिला गैरशब्द वापरले जाणे, याबरोबरच प्रत्यक्षात विवाहाशिवाय किंवा तत्सम् नातेसंबंधामुळे एकत्र राहणाऱ्या स्त्रीचाही या व्याख्येत


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२७