पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या नुकत्याच जाहिर झालेल्या अहवालात महाराष्ट्रातली गुन्ह्यांसंदर्भातली काही बाजूसमोर आली आहे. स्त्रियांवरील हिंसाचाराच्या केसेसमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक देशात चौथा लागतो.अशा केसेसचा दर हा दरवर्षी दहा लाख लोकांमागे १७३.८१ इतका आहे. हा दिल्ली (१९७.१४), मध्यप्रदेश (२०६.९७), आणि राजस्थान (२०८.१६) नंतरचा सर्वात जास्त दर आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बऱ्याच केसेस नोंदविल्याही जात नाही हे वास्तव असूनही एकूण केसेसच्या ४३ टक्के केसेस हा फक्त कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. देशाच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण केसेस मध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या फक्त पाच राज्यांच्या मिळून ६८ टक्के केसेस आहेत.

 महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचाराच्या केसेस मध्ये विनयभंगाच्या केसेसचे प्रमाण २१ टक्के, छेडछाडीच्या केसेसचे प्रमाण ११ टक्के, बलात्काराच्या केसेसचे प्रमाण जवळजवळ १० टक्के आहे. राज्याच्या पोलिस विभागाच्या आकडेवारी नुसार सप्टेंबर २००३ अखेर पर्यंत स्त्रीयांवरील अत्याचाराच्या १०७८५ केसेस दाखल झाल्या आहेत, मागच्या वर्षी हाच आकडा १९०४७ इतका होता. ह्या केसेस मध्ये इतर गुन्ह्यांपेक्षा नवऱ्याने किंवा त्याच्या नातेवाईकांनी हुंड्यासाठी केलेला अमानुष छळ याचे प्रमाण जास्त म्हणजे ४३८३ केसेस इतके आहे. इतर मध्ये विनयभंगाच्या २१०८, बलात्काराच्या १०१२, ९२१ आत्महत्येसाठी प्रवृत्त, मुलींचे किंवा त्रियांच्या अपहरणाच्या ६६९ केसेस, १११ केसेस ह्या हुंड्यासाठी केलेला शारीरिक आणि मानसिक छळाच्या आहेत. ३१ केसेस ह्या हुंड्या संदर्भात आत्महत्या तर ११ केसेस ह्या हुंड्यासाठी खून याच्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक या आकडेवारीचे विश्लेषण करतांना म्हणतात की, राज्यात महिला संघटना, महिला आयोग, सामाजिक संघटना आणि प्रसार माध्यमांच्या जोरदार जागृती कार्यक्रमांमुळे तसेच महिलांमध्ये वाढत असलेल्या शिक्षणाच्या प्रमाणामुळे महिला स्वतःच्या हक्कांसाठी जागृत झाल्या आहेत, त्यामुळे महिलांवरिल हिंसाचाराची नोंद वाढली आहे, म्हणून आकडेवारीही वाढतांना दिसत आहे. याचा अर्थ इतर राज्यांपेक्षा गुन्हे वाढत आहे

असा काढू नये. त्यांच्याकडेही ह्या केसेस आहेत पण त्यांच्याकडे काळजीपूर्वक गुन्हे नोंदविले जात नाही असे यावरुन स्पष्ट होते.

 केंद्रिय महिला आयोगाच्या २००२ च्या अहवालानुसार प्रत्येक २६ मिनिटाला एका स्त्रीचा विनयभंग होतो, प्रत्येक ३४ मिनिटाला एक बलात्काराचा गुन्हा दाखल होतो, प्रत्येक ४२ मिनिटाला एक लैंगिक अत्याचाराची घटना नोंदवली जाते, प्रत्येक ९३ मिनिटाला एक हुंडाबळी होतो.

 स्त्रीयांसाठी अनेक कायदे आपल्या राज्यघटनेत आहेत त्याची यादी आपण पाहिली. तरीही एवढ्या स्त्रीया का मरतात? स्त्रीया मरतात तरी पोलिस स्टेशनची मदत


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२६