पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या दरम्यान भंवरीदेवीची केस सुप्रिम कोर्टात दाखल झाली जिचा अंतिम निकाल आजतागायत लागला नाही पण त्यातल्या एका अंतरिम आदेशामुळे 1997 साली कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळाला गंभीर गुन्हा मानले गेले आणि तो छळ थांबावा व त्या स्त्रीच्या न्यायासाठी काही मार्गदर्शक सूचना विशाखा गाईड लाईन या नावाने अस्तित्वात आल्या. 1994 साली गर्भजललिंग परिक्षेवरिल बंदीचा कायदा अस्तित्वात आला. जून 1993 ला राज्याचा महिला आयोग स्थापन करण्यात आला, ज्याने 1994 साली राज्याचे महिला धोरण जाहिर झाले. 1999 ला आई ही नैसर्गिक

पालक असा निकाल सुप्रिम कोर्टाने दिला.

दिला नवा प्रवाहः- आपण पाहिले की, स्त्रीवादी चळवळीचा पाहिला टप्पा हा कामगार म्हणून तिचे अधिकार, कामाची वेळ इ. विषयांवर होता. त्यानंतर व्यक्ती म्हणून तिचे अधिकार स्वतंन्न पाहिले पाहिजे हा दुसरा टप्पा आला. त्यामुळेच दुस-या टप्प्यात कामगार संघटना असतानाही स्त्रीयांना आपल्या अन्याया विरोधात न्याय मिळवण्यासाठी स्वतंत्र संघटना निर्माण कराव्या लागल्या.

 या प्रवाहात आणखी वैचारिक स्पष्टता येऊ लागली आहे. सर्व स्त्रिया एकच असल्या तरी धर्म, जात पातळीवर त्या त्या स्त्री समूहाचे काही प्रश्न हे स्वतंत्र, तितकेच गंभीर आहेत. त्यासाठी त्या त्या समुहातून नेतृत्व जाणिवपूर्वक तयार केले पाहिजे हा विचार आता मूळ धरू लागला आहे. त्यामुळेच स्त्रीयांची चळवळ एकत्र असली तरी दलितांच्या प्रश्नाच्या मांडणीसाठी त्या त्या सामाजिक-आर्थिक स्तरातूनच नेतृत्व उमं राहू द्याव यासाठी प्रयत्न सुरू आहे.

प्रकरण सातवे
आपण काय करू शकतो

 एकूण मानवाच्या विकासासाठी स्त्रीवादी चळवळीचा हा प्रवाह असाच पुढे नेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने हातातले काम सोडून मोर्चे काढण्याबरोबरच आपापल्या कुवतीनुसार सहभाग देणे आवश्यक आहे. आपण खूप काही करू शकतो. हे करण म्हणजे कार्यक्रमा पुरतं मर्यादित नसाव, ती जगण्याची रित असावी.नमुन्यादाखल

काही खालील उपाय :-

० १.स्त्रीयांवर होणारा हिंसाचार हा कायद्याने गुन्हा आहे कुठल्याही कारणाने त्याच समर्थन करू नये, करू देऊ नये.

० २. पर्सनल इज पॉलिटिकल :- कुठल्याही स्त्रीला होणारी मारहाण हा तिचा आणि मारहाण करणा-यांचा खाजगी प्रश्न नसून या देशाची नागरिक म्हणून राज्यघटनेने तिला दिलेल्या अधिकारावरचे ते अतिकमण आहे. समाजात स्त्री पुरूष समानता नसल्यामुळे तिला हया हिंसाचाराला सामोरे जावे लागते, म्हणून हा पूर्णपणे


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२२