पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजकिय आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे हे स्वतः लक्षात घ्यावे आणि इतरांनाही ते लक्षात आणून द्यावं.

• ३. स्त्री-पुरूष आज जे वागतात हे नैसर्गिक नसून लिंगपदभावाची ती सामाजिक जडणघडण आहे त्यामुळे त्यांना तस वागायला भाग पाडले जाते हे लक्षात घेतले पाहिजे.

• ४. आपण स्वतः आपल्या सद्सदविवेक बुद्धीला, मनाला पटेल तेच कराव, दुस-यांनाही तसे करण्याची संधी द्यावी.

• ५. स्त्री-पुरूषांचे नातेसंबंध हा त्या दोन व्यक्तींचा खाजगी संबंध असतो, जो पर्यंत ती स्त्री त्यात हस्तक्षेप करायला सांगत नाही, तोपर्यंत त्या नात्याबद्दल आपण न बोलण्याची सभ्यता पाळायला हवी.

• ६. एखादया स्त्रीला मात्र कुठल्याही कारणाने, कोणीही मारहाण करत असेल तर आधी ती मारहाण थांबवा. मार खावू नका, कोणाला मारू नका, मारू देऊ नका.

• ७. समोर बोलत उभे असलेले स्त्री पुरूष हे नात्याने कोण आहेत हा खरा आपला प्रश्न नसावा. बरेच लोक काहीही माहिती न घेता दोन बोलणारे, गाडीवर जाणारे, नियमित एकत्र जाणारे स्त्री पुरूष यांच नातं हे फक्त लफडचं आहे हे घोषित करण्यासाठी आणि तसा प्रचार प्रसार करण्यासाठी एकदम उत्सुक असतात. शेकडो स्त्रीयांना, मुलींना त्यामुळे घरच्यांच्या त्रासाला, मारहाणीला, काही ठिकाणी तर नोकरी किंवा शिक्षण सोडून देण्याला किंवा अवेळी लग्नाला ते ही विजोड जोडीदारा बरोबर अशा संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणाच्याही चारित्र्या बद्दल शक्यतोवर बोलू नये, बोलण्याचा प्रसंग आल्यास जबाबदारीने बोलावे.

• ८. घरातल्या मुलींना त्यांची इच्छा असेल तेवढं आणि त्या विषयात शिकवाव. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावा.


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२३