पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गर्भ मुलाचा असेल तर तो बिनधास्त होतो की, आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर आपली काळजी करणारे, संरक्षण करणारे अनेक लोक आहेत, त्यामुळे आपण निश्चित व्हायला हरकत नाही. याउलट मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भ स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. त्यामुळेच गर्भपात होण्यासाठी जर काही प्रयत्न झाला तर मुलाचा गर्भ पटकन पडतो पण मुलीचा गर्भ स्वतःला वाचवतो. लहान मुलांमध्येआपण पाहतो की, जरा वातावरण बदलल की मुलगे पटकन आजारी पडतात पण मुलीपटकन आजारी पडत नाही काही लोक तर एवढे बेदरकार आहेत की ते गर्भजल लिंग परिक्षा करून मुलीचा गर्भ असेल तर काढून टाकतात. त्यासाठी तर आपल्याला या परिक्षेचा गैरफायदा घेणा-या पालकांना, डॉक्टरांना शिक्षा करणारा कायदा निर्माण करावा लागला. पश्चिम महाराष्ट्र हा सुधारलेला, श्रीमंतांचा प्रांत समजला जातो तर तिथं सर्वात जास्त गर्भजल लिंग परिक्षा आणि स्त्री भ्रूण हत्या होतात. त्याउलट गडचिरोली सारख्या अतिदुर्गम, आदिवासी भागात स्त्री भ्रूण हत्या अगदी कमी, नाही के बराबर होतात. तिथलं दर हजारी पुरूषांमागील स्त्रीयांच प्रमाणही सांगली पेक्षा जास्त आहे.

 जन्माच्या वेळी- मुलगी झाली तर फिदरी झाली आणि बर्फीचे वाटप पण मुलगा झाला तर मात्र पेढे वाटणार असं का? काही लोक तर मुलगी झाली म्हणून बाळंतणीला भेटायला देखिल जात नाही. मुलाची वाट पहात मुली होऊ देणा-या एका आईने सासरच्यांचा काय प्रतिसाद येईल या मितीने नुकत्याच जन्मलेल्या मुलीला फटका मारला आणि पहिले दोन दिवसाचे अत्यंत महत्वाचे दूधच पाजले नाही. एका(मला एकच माहित आहे प्रत्यक्षात प्रमाण किती तरी असेल) नव-याने तिसरीही मुलगी झाली म्हणून पत्नीला दवाखान्यातच सोडून दिले.

 शून्य ते सव्वा महिना-मुलगा झाला असेल तर बाळ-बाळंतिणीला मसाजला प्रॉपर मसाजवाली बोलविली जाते पण मुलगी असेल तर घरच्या घरी किंवा तिच्या आईकडूनच आंघोळ घातली जाते अशी होते लिंगपदभावाची सामाजिक बडणघडण मुलगा मुलगी जन्माच्या वेळी

दोघेही समान


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....११