पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण पाचवे
Social Construction of GENDER
लिंगपदभावाची सामाजिक जडणघडण

 असं काय समाजात घडते ज्यामुळे बाई अशी फक्त रडकी, हळवी होते आणि पुरुष मारणारा, चीडखोर, रागीष्ट होतो. हे समजावून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीची वाढ लहानपणा पासून कशी होते. कोण कोणत्या संस्था/यंत्रणा मधून तो जातो, त्याचा काय परिणाम त्याच्यावर होतो हे पाहिले पाहिजे. बहुतेक व्यक्तींच्या आयुष्यात कुटुंब, समाज, मित्र परिवार, शाळा, मार्केट, शासन आणि धर्म हया पैकी काही किंवा कदाचित सर्व संस्था/ यंत्रणा येतात.

 आपण आता जो सिद्धांत समजावून घेणार आहोत त्याला लिंगपदभावाची सामाजिक जडणघडणीचा सिद्धांत असे म्हणतात. हे समजावून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ या समजा एक जुळ जन्माला आले आहे. त्यात एक मुलगी आणि एक मुलगा आहे. जन्मतः जशी मुलगी रडते, बोटं चुखते तसेच मुलगाही रडतो, बोटं चुखतो. अशी ही जुळी मुलं जेव्हा साधारण 15 वर्षाची होतात तेव्हा मुलगी नाजूक, रडणारी आणि मुलगा न रडणारा, धैर्यवान आणि दणकट बनतो असं का?जे आधी समान होते ते पुढे जाऊन वेगवेगळे केव्हा काही ठिकाणी तर एकमेकांच्या विरोधी कसे झाले?

 जन्माला येण्यापूर्वी - काही लोक गर्भवती महिलेच्या पोटाचा आकार, तिला ज्या पदार्थांचे डोहाळे लागले आहेत, जस जाणवतय त्यावरून मुलगा की मुलगी याचा अंदाज बांधतात-याचवेळा त्यांच्या निरिक्षणाच्या अनुभवावरून त्यांचा अंदाज खरा निघू शकतो. त्या अंदाजानुसार त्या गर्भवती महिलेला वागवायलाही सुरूवात होते. याचा परिणाम गर्भावर फारच गंभीर होतो. तुम्ही अभिमन्यूची गोष्ट ऐकली असेलच की, त्याच्या आईने चक्रव्यूह कसा भेदायचा ते ऐकले, पुढे तिला झोप लागल्या मुळे चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे हे ऐकायचे राहिले. त्यामुळे अभिमन्यू चक्रव्यूह भेदून आत तर गेला पण बाहेर पडू शकला नाही. सद्या तर आपल्याकडे सातव्या महिन्यापासून गरोदर स्त्रीला 'गर्भसंस्कार श्लोक' सि.डी किंवा कॅसेट व्दारे ऐकवले साठी विशेष क्लास लावले जातात.

 एखादया बाईला जर उठता बसता सारखं कोणी ऐकवल की तुला मुलगी होणार आहे तर त्याचा परिणाम तिच्यावर नक्की होतो. तिला मुलगीच हवी असेल किंवा तिला मुलगी म्हणून तिच्या लहानपणी चांगली सकारात्मक वातावरण मिळालं असेल; तिच्या ईच्छेप्रमाणे वागू-जगू दिलं असेल तर अशी महिला त्या येणा-या मुलीचा मनापासून

स्विकार करते पण याउलट तिचं आयुष्य गेलं असेल, तिला स्वतःला सतत अडवल्याची वागणूक मिळाली असेल तर अशी स्त्री धास्तावते, घाबरते: काय होईल पुढे माझ्या मुलीचे हया विचाराने दुःखात जाते याचा परिणाम गर्भावर होतो.


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१०