पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

45 गुणसूत्राच्या जोडया तर सारख्याच असतात मग बाई नाजूक, मार खाणारी आणि पुरुष मार देणारा असे कसे होते ?तुम्हांलाही हा प्रश्न पडला असेल ना?खरतर 45 गुणसूत्राच्या जोडया सारख्या असल्यामुळे दोघांमध्येही ममता, प्रेम, राग, चीड हे सर्वच गुण दिसतात. आपल्याला ठेच लागली आणि रक्त आले तर जसे आईला दुःख होते तसेच ते आपल्या वडिलांनाही होत असते. पण आईच्या डोळ्यात पाणी येते आणि वडिल मात्र कोरडेच असे का? याच सोपं कारण असे की, समाज मुल जन्माला आल्यापासून प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गाने वागवतो, वाढवतो. त्यामुळे स्त्री मधले ममत्व, भावना जाहिर व्यक्त करण्याची पद्धत, हळवेपणा, संवेदनशिलता, सहनशिलता वाढते तर पुरुषामधील कठोर, भक्कम गुण असलेले गुणसूत्र अधिक बळकट होतात म्हणून तर आपण म्हणतो की, प्रत्येक बापात एक आई तर प्रत्येक आईत एक बाप असतो किंवा प्रत्येक पुरुषामध्ये एक प्रेमळ स्त्री तर प्रत्येक स्त्री मध्ये एक कठोर पुरुष असतो. आता ही विभागणी कशी झाली हे आपण पुढच्या भागात पाहू, त्याआधी आणखी एक शास्त्रीय माहिती आपण घेऊ यातमानवाच्या मेंदूत ग्रे आणि व्हाईट मॅटर नावाचे रसायन असते. ग्रे मॅटर मुळे जी माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्या मेंदूला मिळते त्याचे विषयानुसार किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करण्याचे काम केले जाते, त्याला म्हणतात इनफरमेशन प्रोसेसिंग. तर व्हाईट मॅटर मुळे आपल्या मेंदूतले जे ज्ञानेंद्रियांचे केंद्र आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले जाते. हे समजावे म्हणून एक उदाहरण घेऊ या. आपण रस्त्याने चालत आहोत. आपण पाहिलं की, एक व्यक्ती हातावरचा डास मारत आहे. ही माहिती डोळया वाटे आपल्या मेंदूत गेली. मेंदूने ही पाहिलेली घटना व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवली. काही दिवसांनी आपल्या हातावर डास बसतो. काही सेकंदात आपण हात उचलतो आणि डासाला मारतो. खरतर माहिती डोळ्याने घेतलेली होती मग कृती हाताने कशी केली ?तर हा जो समन्वय आहे तो व्हाईट मॅटर मुळे होतो. डास चावणं आपण कुठं अनुभवलेलं होतं?आपण तर फक्त पाहिलं होतं. पण त्या व्यक्तीने ज्या चीडेने, स्पीडने डासाला मारले याचा अर्थ त्याला तो चावला हा विचार ग्रे मॅटर मुळे आपल्या मेंदूने त्यावेळेसच करून त्यानुसार ती माहिती संबंधित विभागाला ठेवून दिली होती हे आपण सविस्तर समजावून घेणे अत्यंत महत्वाचे आहे जीवशास्त्राच्या मांडणी प्रमाणे ग्रे मॅटर है 6 पटीने पुरूषाकडे स्त्री पेक्षा जास्त आहे, तर व्हाईट मॅटर हे 10 पटीने स्त्री कडे पुरुषापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ एखादे संकंट आले तर स्त्रीने पुरुषापेक्षा 10 पट लवकर त्यावर प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजे दोघांच्या हातावर एकाच वेळी डास बसला तर स्त्रीने पुरुषाच्या 10 पटीने आधी हात उचलला पाहिजे अस शास्त्र सांगते. पण स्त्री मरेस्तोवर मार खाते पण कधीच हात धरत नाही, किंवा उलटा फटका देत नाही अस कस काय होतं हे आपण पुढच्या

प्रकरणात समजावून घेऊ या.


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....९