लागीर ८९ 5 खोपटातलं सारं डोळयापुढं येत होतं. चुलीवर गळत असेल. नवन्याला चहा तरी करुन घेता आला असेल का? आपल्याला बगितल्यावर तो काय करील? मारुन तरी घरात घेईल का? खोपटात दार लावून मारील की चार-चौघात बडवील? अंधार पडायच्या आत तिथंपर्यंत जाईन का? 'नवयानं मारलं नि पावसानं झोडपलं सांगायचं कुणाला? तिला त्या म्हणीचा नव्यानं उलगडा झाला. दया ना माया निव्वळ दगड; पण त्यालाच देव मानायला लागतं! तिला तिच्या नशीबाचा नेहमीसारखा राग आला. अजूनही स्टोव्हच्या निळ्या ज्योतींकडं ती पहात होती. पावसाचा जोर कमी नव्हता. तिचं अंग गारठलं होतं. छपरातून गळणारं पाणी तिच्या केसावरुन ओघळत होतं. STF FF TFS PSYKIFINUP तो बापासारखा माणूस आता उठला होता. त्याची नजर तिच्या पाठीमागे होती. तो काय पहात होता? तिनं मागे वळून पाहिलं तेव्हा त्या वापासारख्याचे हात तिच्या रख्याचे हात तिच्या कमरेभोवती पडले आणि ती घाबरुन ओरडली, ( बाबा, सोडा ऽ वो, सोडा मला ऽऽ - S 5515 ME तो कसनुसा हसला. ती धडपडत म्हणाली, की पाया पडते तुमच्या पण मला -- कोशि ८ पाया कशाला पडायचं? वाब किती मामुली इथं कोणबी Koh FIRST PPFIS PIF 153 &F नायक -- तिनं सारी ताकद पणाला लावून उसळी मारली. एखादी वांब हातातून सुटावी तसे तिचे ओले हात त्याच्य त्याच्या हातातून सटकले आणि ती धावत सुटली. FIF 2 2 13ISTE पळत ठेचकाळत-भेलकांडत ती खूप दूरवर आली. तरी तिच्या काळजातील भीती गेली नव्हती. मीणा आता तिच्या वस्तीचा मळा। जवळ आला होता. तिला धीर आला होता. एका अनोळखी सैतानाच्या हातून ती सुटली होती. आता तिला रडू येत होतं नि ती ते दाबून धरत होती. तरीही डोळया- तील पाणी हळू हळू गालावर ओघळत होतं. ठेचकाळल्या पायांच्या 13
पान:लागीर.pdf/९६
Appearance