Jump to content

पान:लागीर.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ८८ याचा नेम नव्हता. म्हसोबाचा माळ ओलांडून राजाक्का शिंदेवाडीजवळ आली. वस्तीलाच आता वाडी म्हणू लागली होती माणसं. वाडीत शुकशुकाट वाटत होता. चार-पाय घरं नि सात-आठ छपरं दिसत होती. कौलारा- तून धूर चोरपावलानं निघावं तसा निघत होता. माणसाच्या अस्तित्वा- चा तेवढाच एक पुरावा होता. गुरांच्या गोठ्यात गुरांबरोबर कोंबडी कुत्रीसुद्धा पावसाला भिऊन उभी असल्याचे दिसत होते. अजून मैलभर जायचं होतं. तोच टपोऱ्या बोरासारखे थेंब पडू लागले. गारा पडू लागल्या. पुढं जाणं काही खरं नव्हतं. पायातल्या पायताणाला माती चिकटून ते जडशीळ झालं होतं. राजाक्कानं पाय- ताण काढून हातात घेतलं नि जवळच्याच खोपटात ती जावे की न जावे या विचारात डुचमळली. तेवढ्यात डोळे दिपवून टाकणारा वीजे- चा लोळच लोळ कडाडून खाली आला. दुसऱ्या क्षणाला भेदरलेली राजाक्का छपराच्या आडोशाला झाली. पावसाची सर ओसरु द्यावी म्हणून ती उभी राहिली. कुडाच्या आड पेटलेल्या स्टोव्हजवळ एक दाढी वाढलेला मळकट माणूस बसला होता. स्टोव्हवर छोट पिप होतं.. त्याला नळया-नळकांडचा जोडल्या होत्या. सर्वत्र तो पर्प दाटून होता. राजाक्काच्या मनाला खटकलं. थोडा वेळच तिला तिथं थांबायचं तिला काय घेणं होतं? तो माणूस तिच्या बाबांच्या वयाचा होता. ती आल्याची दखल त्याला होती; पण त्यानं फारसं तिकडं लक्ष दिलं नाही. तो आपल्याच तंद्रीत वसून होता. पावसाचा जोर वाढला होता. आता हा बाबा थांबणार? राजाक्का मनातल्या मनात प्रार्थना करीत होती. कधी बाहेर भिजल्या मातीचा चिखल-रबडा झाला होता. गढूळ-गदळ पाणी उताराकडं वाहू लागलं होतं. चिखलात पाऊस नाचत होता. राजाक्काचं लुगडं गुडग्यापर्यंत चिखलपाण्यानं भिजून राड झालं होतं. पावसाचा जोर आणखी वाढला. तेव्हा ती कुडाच्या आणखी आतल्या अंगाला सरकून उभी राहिली. स्टोव्हच्या भरारणाऱ्या जाळाकडं एक- टक पहात तिच्या मनात विचारांचं थैमान चालू होतं. तिला तिच्या