Jump to content

पान:लागीर.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदना आता तिला जाणवू लागल्या होत्या. उजव्या पायाच्या अंगठयाचं नख मुळापासून उखडलं होतं. बारा महिने दुःखाचा भोगवटा काय नशीब म्हणावं? त्या वापासारख्याच्या खोपटात पायताणं राहून गेल्या- ची जिव्हारी चुटपुट लागली. अजून चार-सहा महिने कशीही टिकली असती. आता तो खवीस विचारील त्याला काय सांगणार? खरं सांगि- तलं तर • ठेवील का विश्वास ? तिचा गळा दाटून आला. जांभळडोहाच्या वरतीकडून णीतरी येत असल्याचं दिसलं. तिच्या नवऱ्यासारखं. असायचा दुसराच कोण! दैव हात धुऊन पाठी- शी लागलंय म्हटल्यावर - तिनं वाट वाकडी केली. अशांच्या वाटे- वर चुकून जाऊ नये. ती मनाला वजावत होती. विपरीत बुद्धीच्या माणसाचा आली. चा भरवसा देता येत नाही! तेवढ्यात तिच्या कानावर हाक लागीर ९० 'राजे ऽऽ, राजे हो ss! कतिचा नवराच होता. मघाशी खात्री वाटली नव्हती. आता कळ दाबल्यासारखी ती वाटेवर उभी राहिली. आता नव्या मरणाला सामोरं जायचं म्हणून! राजांक्का मनाला धीर देऊ लागली. 22 HORES तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला. नव्यानं पाहिल्यासारखं त्याने तिला उभीच्या उभी न्याहाळली. ती रडल्याच ह . ती रडल्याचे हेरलं आणि कुत्सितपणानं हसून म्हणाला, 7 तरी कशी तुला ? वादळ उठलंय उन्हानं? एवढा येळ केला. काय शानपण म्हणावं? म्हाता-यानं धाडली वारं काय सुटलंय वळवाचा पाऊस, इज- म्हातारपण आलं केस पिकलं ते वयानं का --- - आयला ऽऽ काय तरी डोस्कं चालवू नाय माणसानं - - तरणी ताठी पोरगी घाडली एकटी-दुकटी वक्ताला कायबी जाणीव नसावी? ह अशा - तो बडबडत होता. अजून तरी त्यानं तिच्यावर हात टाकला नव्हता. उलट तिचा कळवळा येऊन तो तिच्या बापाला दोष देत होता. तिला एका बाजूने दुःख वाटत होतं; पण एक मन सुखावत होतं. बहु- तेक आज तो तिला मारणार नव्हता. या अंदाजाने ती सुखावली होती. ---