लागीर ८७ ' खरं हाय बाबा. हातात माल पडस्तोवर 'काकी' देवासारखी वाटली. आता दारातल्या कुत्र्यावाणी लागला हाड हाड करायला. मी थोरलीकडं जाते. अगदी आत्ताच निघते; पण ध्यानात ठेव मला म्हातारपण आलं. तुलाबी एकदा येईल. आठवंल तवा कळंल चुलतीच्या काळजातली कळ. तुमी अगदी रामराज्य करा. माझी आडगळ ह रहात नाय. चला ! आतील भांडण संपलं होतं कोण ती 'काकी पुतण्याचं घर सोडून थोरलीच्या घरी निघाली होती. राजाक्कानं उंबऱ्याबाहेर पाऊल टाकून घाईनं रस्ता धरला. आपला पायगुण काही चांगला नाही. जाईल तिथं वणवा. तिला तिच्या भणंग नशीबाची पुन्हा एकदा पटली. खात्री आणाचंस. J ए, पोरी कुठं चाललीस? राजाक्कानं मागं पाहिलं. त्या घरातून बाहेर पडलेली ती 'काकी' होती. कमरेवर कपड्याचं बाचकं. कमरेत वाकलेली. माझ्या घरला चाल्ले. कुठ तुझं घर ? गाव कुठलं ग ? पाडळी ' 'एकलीच चाल्लीस. येळतरी बगायचीस. संगतरी कुणाला 'येण्यासारखं कुणी नव्हतं. जरुरीचं काम हुतं म्हणून आले. ' पाय उचल पोरे, अजून लई पल्ला गाठायचा. या म्हातारीला स्वतःचं दुःख नसल्यासारखं दुसऱ्याचं दळण घेऊन दळायची केवढी हौस ? पुतण्यानं हाकलून दिलं तरी वाटेच्या मला जल्दी जाण्यासाठी सांगत बसलीय. राजाक्काला नवल वाटलं. संकट सोसून सोसून अंगवळणी पडली, की माणूस असंच वागत असेल का? मीपण अशीच होईन का ? आणि म्हातारीचं वैधव्य तिच्या मनात डोकावल्या बरोबर तिच्या जीवाला चरका बसल्यासारखं झालं. मन फार पापी! काहीपण वाईट विचार करतं ! म्हातारी आता खूप मागं राहिली होती. पाऊस कधी कोसळेल
पान:लागीर.pdf/९४
Appearance