लागीर ८५ पेक्षा उघडपणानं आणखी काय सांगणार होता? ती सारं उमगली. तान्ह्या लेकराला चाचपावं तसं म्हाताऱ्याचं रोड झालेलं शरीर माये- च्या हातानं चाचपलं. दाटून आलेल्या कंठाने तिने निरोप घेतला. ती झोपडीबाहेर पडली तेव्हा बापानं आपलं डोळं पुसलं, तरी पुन्हा पाझ- रत राहिलं; पण उरावरचा दगड इ खाली ठेवावा तसा जीव हलका झाला होता. वारा दडला होता. गदमदायला लागलं होतं. पावसाची लक्षणं होती. घटका दोन घटकानं वळवाचा पाऊस येणार, गाराचा पाऊस पडू लागला तर मोठंच संकट होईल. म्हातान्याचं मन त्याला खाऊ लागलं. उगीच मालकाच्या भितीनं आपल्या पोरीला अशा ऐनवेळेला पिटाळलं. आता वाटेत काय होतंय देव जाणे! राजाक्का पावसाआधी तिच्या वस्तीवर पोचेल का? उगाच पिटाळलं. तिचा नवरा काय म्हणेल? म्हातान्याचा जीव तळमळत राहिला. दडी मारुन बसलेला वारा सैराट धावू लागला. शिवारातील मातीच्या गदळ घेऊन लाटा उसळू लागल्या. झाडाखालचा पाचोळा उडू लागला. झाडाच्या वाळल्या-कुजल्या फांद्या 'कडा ऽऽ का ऽऽड' आवाज करुन मोडू लागल्या. पाखरं मोठ्या झाडाच्या निवाऱ्याला दडी मारुन बसली. बांधणीत ढिलाई झालेलं एखादं बुचाड सान्या शिवारभर विस्कटू लागलं. राजाक्काच्या मनात विचाराची वावटळ उधळली होती. पदर रहात नव्हता. ती झपाट्यानं चालत होती. वाऱ्यानं डोकीवरचा केस विस्कटून गेले होते. साळयाच्या वस्तीवरुन राजाक्का जात असताना वीज कडाडली. त्या गगनभेदी कडकडाटानं ती जागीच हादरली. शिवार दणाणलं. कुठं तरी वीज पडली होती, अतिशय भयानंच ती जवळच्या घरात शिरली. दाराच्या तोंडशीच उभी राहिली. घरातले लोक तिला दिसत नव्हते; पण भांडण ऐकू येत होतं. ( T काकी, थोरल्या वैनीला तू तुझी वजरटीक दिलीस. माझ्यात F , खाती- पितीस नि तुझं इमानं आसं ! तिला येळपरसंग आला म्हणून दिली. '
पान:लागीर.pdf/९२
Appearance