Jump to content

पान:लागीर.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ८३ कसला मुक्काम? येळ कुणाला हाय ? जायाचन् हायाला कोण येत वो? पण आल्यासारख्या दोन राती काढा- व्यात कऽऽसं? ' त्यानं वेगळ्याचं नजरेनं पाहून विचारलं. राजाक्काचं काळीज लखकन् हाललं. तोडून बोलावं तसं ती बोलली, सवड नाय कामाचं खाडं नाय परवडत आमाला. 1 हुइना का खाडा झाला तर जीवाला इसावा तरी घडलं. आला तसं दोन राती रहा. सांच्याला कोंबडा कापतो. म्हाताऱ्याच्याबी पोटात दोन घास जात्याली. तुमीच करा सैपाक. इथं होऊ काय बाबा? द्या बेत. TIFFEN " तसं नाय मालक. तिच्या तिकडंच लई आडून पडतं. हाणं , तिला नाय जमायचं. ( एका रातीनं काय हुणार हाय ? त्यांच्या हातचं आजला मटण खावंच म्हंतो मी. कसं? ' राजाक्का गप झाली. म्हातारासुद्धा काय बोलला नाही. किती दिवस झालं. चटणी मीठाचं फळकपाणी खावून जीभ बेचव झाली होती. आपल्या निमित्तानं बाबाला दोन घास चवीचं जेवण मिळतंय तर आपण मोडता घालतोय. गरीबाला अभिमान आपल्या अभिमानीपणानं आ फायद्याचा नसतो. "काय म्हणतो मी? SIF BUIT पुढयात पडलेला शेंगेचा दाणा न कळत तोंडात टाकून राजाक्का लाचार हासली. पसाभर शेंगदाणं सोलून तिनं दगडाच्या चिप्पीवर ठेवून ठेचून बारीक केलं नि बापापुढं केलं. तिच्या साया हालचाली मालक टक लावून बघत होता. लग्नाआधी पासून मनात भरलेली ही रामबाबाची राजाक्का अशी अवचित वस्तीवर माहेराला आली होती. दुखणेंकरी बापाला बघायला. देवसुद्धा एखाद्याच्या मनची इच्छा पुरी करायला निमित्त घडवीत असेल, असं त्याला मनापासून वाटलं आणि तो आपल्या नशीबावर खूष झाला. म्हातारा गुळाबरोबर कूट मुळूमुळू खात होता. मालकाचं तोंड जात्याच्या तोंडावाणी राजाक्काला न्याहा- ळत गूळ-शेंगदाण्याचं घास हपापल्यासारखं घेत होतं.