Jump to content

पान:लागीर.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंग टाकतो. भूक नाहीच. छताला एक कोळ्याचं जाळं दिसतंय. दोन कोळी दिसतायत त्यात. जिवंत असतील तर सोबत वाटेल. मी सिगारेटचे थोटूक फेकून पाहतो. कोळी जागा बदलतात; पण सिगारेट लोंबतेय राक्षसाच्या जिभेसारखी नि ते कोळी भयानक दोन डोळया- सारखे! राक्षस व भुताच्या वाह्यस्वरुपात काहीच फरक नसावा नाही का? दारावर टक् टक्! कोण असावं? नसावंच कोणी. भास व्हायचा, आपण दार उघडायचे आणि काही भलतंच - -! -? आता जोरात टक् टक्, धडका देतात की काय? 5 ! अरे एऽ बाबू, लेका झोपलास की काय रे? 2 FRETT " लागीर २ "वाबू ८ कोण आहे? 6 अरे, मी श्री – श्रीकांत - , स्वप्न तर नाही ना? मी खसखसून डोळे चोळतोय. 4 अरे बाबू, दार उघड नाऽऽऽ किती मोठ्याने ओरडतोय हा. हातांना कंप सुटलाय माझ्या. मी कडी काढतो. श्रीकांत हसतच आत आलाय. मी पण हसतो. (खरे तर तसे दाखवतो.) तो उत्साहातच म्हणतो. दुपारपासून तीन वेळा आलो. पत्ता कुठंय तुझा? मी नुसता त्याच्याकडे पाहतोय. तो माझ्या खांद्यावर थाप टाकतो. श्रीकांत आता पहिल्यापेक्षाही बलदंड वाटतोय मला. मी त्याचे पाय पाहतो. उलटे नसतात. हायसे वाटते. मी त्याच्या नजरेला नजर मिळवून खरे हसतो. प्रकृती वरी नाही का रे तुझी? त - तसं ठीक आहे की. म - मालती गावाला गेलीय.' ( ओह! आय सी. वहिनी गावाला गेल्यात ---तरीच, ' तो डोळे मिचकावतो; पण मी आखडल्यासारखाच. काय बोलावं? 'वहिनी भांडून तर नाहीत ना गेल्या ? "अं? छे. छे! नाही तसं काहीच नाही. 1319