पान:लागीर.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ET SI FUTE FIF Bris stunda TEMES THE ET JEST TOP FEST की FRam Hasin बाधा दिवेलागणीची वेळ. घराकडे वळलेल्या गाई-गुरांची चाहूल येतेय, मालती माहेरला गेलीय. घर गुहेसारखं वाटतंय. एकाकी-भय- सूचक- शांत. दोरीवर मालतीचं जुनेर मंद हेलकावे घेतंय. मनात अनामिक भीतीची पाऊलं वाजतायत. मी उभाच आहे अजून. सशाचे कान नि माकडाची नजर जणु मला लाभलीय, HIST , ‘कर्र ऽ ऽ ऽ र्रर्र खट्! अं? खिडकीचं दार वाजलं. दरवाजा लावायला हवा. खिडकी लावल्यावर मी कोनाडे न्याहाळतो. मनातील भीतीचे कोनाडे सैल होतायत. टेबलावरची पुस्तकं जुळवून व्यवस्थित लावून झालीत. टेबल पुसून झालाय. आता काय बरं करीत बसावं? जावं का कुठतरी ? छे! परत यावंच लागेल. मग? दरवाज्याचं दार कुरकुरलं विव्हळल्या सारखं. पुन्हा मनात भीतीचा विषारी फणा ! एवढा भित्रेपणा नसावा. नाही का? त्यात पुरुष मी, कीव येते माझी तुम्हाला? माझी मलाही कीव करावी वाटते. करणार काय? मी अनुभवलं ते कुणी इतरानं अनुभवलं असतं, तर माझ्या वागण्यात त्याला काही गैर वाटलं नसतंच. घडलंच तसं, मालतीसुद्धा मला हसते, तुच्छतेने. कधी कधी चिडतेसुद्धा! कॅलेंडरची पाने फडफडतायत. आज आज तारीख बारा अमावस्या ! वाप रे मी झटकन् दरवाजा लावून घेतो. कडीत उलथाणे घालतो. आता थोडं सुरक्षित वाटतं; पण तरीही एकटेपणाचं भय घेऊन मी कॉटवर