लागीर ८१ होती. रात्री तो तसा प्रकार घडला. उपाशीच रात्र काढली. आता दादाआप्पानं पुढं केलेल्या घासावर पोटाची आग शांत केली; पण घासागणिक डोळं भरुन येत होतं. जीवाच्या कळा कुणाला सांग सांगता येत नव्हत्या. दशम्याची फडकी झाडून, पाणी पिऊन, रोजगारी कामासाठी शेतावर गेलं. राजाक्का बाबाजवळ बसून होती. त्यांचा डोळा लागल्या- सारखा दिसला. बसून तरी काय करावं? तिनं कमरेची मिश्रीची डबी काढून दात घासायला सुरुवात केली. डोळ्यापुढं रात्रीचं रामायण येत होतं. उदास वाटत होतं. एकमेकांच दुःख समजून घेतल्याबिगर नाती- गोती काय कामाची? नवरा तर दम देऊन बसला होता. 61 " पुन्ना आसऱ्याला घेणार नाय. म्हणाला होता. ह्या धरणीवर पडलेल्या दुखणकरी बापास काय सांगावं? कसं सांगाव? नि तो काय मार्ग काढील? वणव्यात सापडलेल्या अश्राप गाईसारखा तिचा जीव आतल्या आत हंबरत होता. इथं आड तिथं विहीर, काय करावं? रात्रीचं नवऱ्याचं रुप आठवलं, तर तो पुन्ना खोपटात आसरा देईल, याचा शपथेवर भरवसा नव्हता! दोन दिवस आल्यासारखे इथं काढावेत. पण कसं? आपल्या पोटाचा दुसऱ्याला भार? जग काय म्हणेल? येता- ना एक भाकरीसुद्धा बांधून आणण्याची हिंमत झाली नाही. परत जावं तर तो भला माणूस आग्यातयोळासारखा वडवत सुटेल. तिचा जीव सशासारखा थरारला. हात-पाय मोडून ठेवील खवीस. मरणापेक्षा आंधळं-पांगळं होऊन जगणं वाईट. बाईचा जन्म! फटफटीचा आवाज आला. म्हातान्याला जाग आली. शेजारीच राजाक्का कलंडली होती. तिला तो म्हणाला, T'बये राजाक्का ऽ, ऊठ मालक आलं. ' , चटकन उठून राजाक्का पदर सावरुन बसली. कुडाला पाठ लावून अंग चोरुन ती बसली होती. ढग गडगडल्यासारखं हसत उभ्या आडव्या अंगाचा गडी झोपडीच्या तोंडास उभा राहिला. त्याला पाहून राजाक्का चा जीव दडपून गेला होता. DF 'कोण पावणीबाय? राजाक्का आलीय व्हय?
पान:लागीर.pdf/८८
Appearance