पान:लागीर.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भावना उमाळून आल्या होत्या. शद्व कुचकामी ठरले होते. राजाक्कानं आपल्या पदरानं बाबांचं डोळं पुसलं. गालाच्या हाडावरुन तिचा हात न कळत फिरत राहिला. काय बोलावं तेच उमगत नव्हतं तरी म्हणाली, वाबा, काय हुतं तुमास्नी? ' ( ( 'काय न्हाइ बाळा, कनकनी येती अंगात. खावत न्हाइ 7 लागीर ७९ 4 हात दुखायचा कमी झालाय का? " बाबा खिन्न हसून म्हणालं, 'कमी कसं येणार? पिकलं पान फांदीला जोडायचा शानपना खरा नव्हं! " कनकनीवर औषध-पाणी घेता का ? 'दोन तीन येळा कडुलिंबाचा रस घेतला. अनासीलची गोळी लई तरास पडला तर. J बी घेतो " अशा दुखण्याला ती गोळी कायवो कामाची? त्या परास तुमी सरकारी दवाखान्यात आडमीट झाला असता तर -- ? ' 'ते खूळ नगं डोस्क्यात सारुस. बरं हाय हिथंच. मला ठावं हाय सरकारी दवाखान्यात काळाबाजार चालतो ते. आपला सोपानकाका हुता की सरकारी दवाखान्यात. तिथं ह्येची-त्येची मूठ दाबावी लागती. आपल्यासारख्याचं तिथं काय जमत न्हाइ. EN 'तरीपण खाजगी दवाखान्यापरास कमी पैसा लागतो. बीनघोरी रहाता येतं. ' ‘माझे बये, खुळीच तू. पुलीसखातं बदनाम झालंय; पण तसाच कित्ता समदीकडं. मोठ्या डाक्टरपासून ते झाडूवाल्यापातूर सायास्नी • लायकीपर्मानं पैसा द्यावा लागतो. ' न्हाइच ' देणाऱ्यापास्न घेतबी अस्त्याली. आपल्याकडं , तर काय घेत्याली? ' मग ध्यानचं देत न्हाइत. औषदाच्या वासात कुढत इव्हळत रातन् दिस पडून रहाणं सोपं हाय का? दुखणं कमी होण्याऐवजी वाढायचं. आपला जीव गुतलेला असतो. पैसा काय का होईना दिल्या- बिगर सत ना गत.