Jump to content

पान:लागीर.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ७८ अंगावरचं पोलकं घामानं चिप्प झालं होतं. आतल्या अंगानं घामाचं पाझर सुटलं होतं. मांड्यांना ओला ओलं पातळ चिकटून पायाची गती रोखत होतं. वस्तीवर गेल्यावर आंब्याच्या झाडाखालच्या खोपीत तिचं बाबा पडून आहेत, असं कळलं. काळीज अगदी सुपाएवढं झालं. हरिणीवाणी राजक्का खोपीकडं धावली. आत गेली. बाबा जागंच होतं. राजक्काला वघून त्यांचा चेहरा टवटवीत झाला; पण हालता येत नव्हतं. राजाक्का- ला तर काय नि किती विचारु झालेलं. ऊर धपापत होता तरी विचा- रीत राहिली. चेहऱ्यावर घामाचं उपळं फुटलं होतं. बाबा डोळयानं आपल्या लेकीची माया पहात होतं. होय नाही एवढयाच शद्बात बोलत होतं. जादा बोलवत नव्हतं, लई वाट बघावी लागली ना बाबा? तोंडावर उसन हसू आणून तिनं विचारलं. , छ्य: आता वाट बघावी लागणारच. तुमचं मिळवायचं सुगीचं दिवस, येणं-जाणं तुझ्या येकलीच्या मर्जीवर हाय का ? ' बाबाच्या अंगावरची चादर बाजूला करुन राजक्कानं पाहिलं. मोडका हात फडक्यानं बांधला होता. वरती कळकाच्या कांबी लावून आधार दिला होता. हात इथून तिथून सुजला होता. एखाद्या पट्टीच्या पैलवानासारखा सम्धम् दिसत होता. हाताचा पंजा आपल्या हातात घेऊन राजाक्कानं कुरवाळला. तेवढंसुद्धाबाबांना सोसलं नाही. माझ्या- वाणी तळमळलं. हाताची बोटं रताळीसारखी सुजली होती. डावा हात घडसा होता, तो हातात घेऊन राजवकानं आपल्या गालाला लावला. तिला भरुन आलं. आईच्या माघारी आईची माया देणारा तिचा बाप धरणीवर पडला होता; पण एक दिवस भेटायचीही तिला चोरी झाली होती. शिवीगाळ, मारहाण खाऊन ती बाबांना भेटायला आली होती. अंतःकरणाच्या यातना एकमेकाला बोलल्याशिवाय कळत नव्हत्या, तेच तिला कितीतरी चांगलं वाटलं. दाढीचं रुपेरी खुंट वाढलं होतं. खोल खोल गेलेल्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. गालाची हाडं वर आली होती. दोघांच्या अंतरीच्या