लागीर ७७ गुळमुळ शब्दात त्याला शांत केला. नवरा-बायकोच्या भांडणात शहाणी माणसं पडत नाहींत म्हणतात. ती सारी शहाणी होती. चार शब्द उप- देशाचं बोलून आपापल्या खोपटात सारीजण गेली. राजाक्काच्या निघून गया ह नवयानं निर्वाणीचं सांगितलं, ' तू जाऊन बघ. मी तुला पुन्ना या खोपटात नाय. कर मनाचा कारभार. जाच तू ! देणार ●रातीला एवढं रामायण घडूनसुद्धा राजाक्का तांबडं फुटायच्या आत माहेरच्या रस्त्याला लागली होती. C चहुबाजूंनी काळचाकभिन्न घटींगण ढगांनी धरणीवर वाकून बघायची घाई केली होती. ढगामुळे अंधारुन आलं होतं, घाईघाईनं चालणा-या राजाक्काचं पाय ढेपाळल्यासारखं जड झालं होतं. नागठाण्याचं शिवार लागलं. आता नागठाण्याचं म्हणून काय ते आखून दिलं नव्हतं. अर्धा मैलाच्या शिवारात मागं-पुढं नागठाणकरांची शेती होती, तशी पाडळकरांची होती नि बोरगावकराचीपण होतीच की. पोतराजानं जाधवाच्या वस्तीवर बाबा आहेत म्हणून सांगितलं होतं; पण कोणत्या जाधवाच्या हे विचारलंच नव्हतं. जाधवाच्या दोन-तीन नि वाघझयाकडंची वस्त्या होत्या. नदीकडं एक, क एक- जाधवाची वस्ती. राजाक्कानं डोंगराकडंच्या वस्तीची वाट धरली. आता माणूस लई व्यवहारी बनलंय. बागायती जित्राब काढू लागलंय, हातात पैसा खेळता राहतोय. समाजात रुबाब वाढतोय, कुणाला हे नको वाटतं का? ज्यानं त्यानं आपल्या शेताभवती कुंपण घातल्यालं दिसतं. पूर्वी असं नव्हतं. जिरायती पिक काढलं की, कोस दोन कोस शेतं घोंगडी अथर- ल्यासारखी दिसायची. डोंगराकडच्या वस्तीवर कळलं की, तिचा बाबा वरच्या वस्तीवर आहे म्हणून. तिचा जीव तर चिमटीत आलेला. त्यात हे काखंला कळसा नि गावाला वळसा. ती तशीच वरच्या वस्तीची वाट काढीत शेतातून बांधातून आडवाटनं निघाली. उन्हाचा तर कहार झाला होता. उन्हानं अंग धगधगून निघत होतं. काहीलींत टाकल्यासारखंच झालं होतं तिला.
पान:लागीर.pdf/८४
Appearance