Jump to content

पान:लागीर.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आभाळाखाली पोरकाच होता. जिवाभावाचं जवळ कुणी नव्हतं. हाता- वर पोट भरणाराचं हातपाय थकलं, की तुटलेल्या वावडीसारखी मुलुखमैदान दैना ! पंधरा दिवस होऊन गेलं. मोडका बाप परस्वाधीन जीणं जगत होता. दुसऱ्याच्या दये-मायेबर जगत होता. दुखलं-खुपलं तर सेवां करा- यला नाहीच; पण जवळ बसायलासुद्धा कुणी नाही. काही बरं-वाईट झालं. तर कुणाला लवकर दाद मिळायची नाही. काय देवा एखाद्याचं नशीब घडीवतोस? विचारा- विचारानं राजक्काच्या जीवाला कळा लागल्या. डोळचातल्या आसवात चुलीचा जाळ तांवडा ला लाल दिसू लागला. दिवस मावळला. रोजगारी कामावरुन सुटलं. राजाक्का खोपीत आली. तिचा नवरा तिच्या आधीच येऊन वाकळंवर उताणा पसरुन खोपीच्या वाश्यांकडं बघत पडला होता. चहापाणी झालं. चुलीवर डेचक्यात चवळ्या शिजत टाकून राजावका बसून राहिली. नवऱ्यापुढं बाबाला भेटायला जाण्याचा विषय कसा काढावा असा तिला प्रश्न पडला होता. नवरा तसा दिसायला बावळा पण वोलायला खवाट. दुसऱ्याचं अंतःकरण जाणणारा नव्हता. राजाक्काच्या मनात शब्दाची जुळवा जुळव चालली होती चुलीतली चिपाडं ती उगींच मागं-पुढं सारत हुती. मनात तगमग चालली हुती. आज पोतराज भेटला हुता.' दिसला. ' ( वाबास्नी जरा जास्तीच हाय ( लागीर ७५ 2 डाक्टरीन हारे तू हाईस का का? बाबानी भेटायला बोलावलंय मला. या मंजी? ' म्हणत हुता. J तू भेटून तुजं बाबा बरं हुणार हाईत का? '- - पण भेटून यावं म्हंते. तू मनाची मालकीनं कधीपास्न झालीस? ,