Jump to content

पान:लागीर.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ७४ णींच गुज संपलं नाही. तांबडं फुटायच्या वेळेला दोघीनं आवर-सावर केली. चहापाणी झालं. म्हातान्याला तब्येतीला जपायला सांगितलं. रावदाजींना म्हाताऱ्याकडं लक्ष ठेवायला सांगितलं. राधाक्काने निघ- ताना म्हाताऱ्याच्या हातावर पंचवीस एक रुपये ठेवले. राजाक्काला ओशाळल्यागत झालं. रात्री पोराच्या हातावर दिले, तीच तिची सारी ठेव, कसं कुणाला सांगावं? सांगण्यासारखं आहे का हे? म्हाताऱ्याचा निरोप घेताना दोघींच हृदय भरुन आलं होतं; पण म्हातान्यासमोर त्यांनी डोळयातून टिपूस काढलं नाही. येताळबाच्या फाटचापर्यंत दोघीं आल्या. तिथून राधाक्का एस्. टी. नं रहिमतपूरला गेली. राजाक्काचं गाव आडवळणी. त्यात सध्या ऊसतोडीसाठी शिवारात वस्ती. राधाक्का एस्. टी. नं गेल्यावर राजाक्का पायवाटेनं आपल्या मार्गाला वळली. वस्ती गांठायला राजाक्काला जेवण वेळ झाली. तिच्या नवऱ्यानं सत्त्याप्पानं शेजारच्या वनीकडनं दोनच स्वतःपुरत्या भाकरी करुन घेतल्या होत्या. त्याच ताटात घेऊन तो खात होता. कामाची वेळ झाली होती. आत्ता भाकरी करत बसलं तर आजचा रोजगार बुडणार होता. म्हणून राजाक्कानं ढसा ढसा पाणी पिऊन ऊसाच्या फडाचा रस्ता धरला. नवरा घुश्शातच होता. सासऱ्याचं कमीजास्त विचारण्याची साधी माणुसकीपण त्यानं दाखवली नव्हती. शेजारच्या कुडाच्या खोपीतून आया-बायांनी विचारलं. राजाक्कानं सांगितलं, त्यावर तिच्या नवन्याचा मनातलं प्रश्न सुटलं होतं. त्यानं ज्यादा विचारण्याचा हुरुप दाखवला नाही. राजाक्का पण जितक्यास तितकं वागण्या-बोलण्यात सरावली होती. लई पाघळून लोणी लावायचा तिचा स्वभाव न मनात म्हणाली, नव्हता. ह्या माणसाच्या मनात माया नाय तर आपुन पाणी लावून पान्हा फुटायची वाट का बघावी? , बाबाला बघून आलेल्या राजाक्काच्या मनात त्याच्या दुखण्याचा घोर होता. उघड कोणाला बोलून दाखवता येत नव्हता; पण मनाला वाळवी लागल्यावाणी ती झुरत होती, नि काल पोतराजानं सांगावा आणला होता. पोटात कालवाकालव उसळली. दोन लेकींचा बाप