Jump to content

पान:लागीर.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ७३ बसलं! दोन्ही पोरींचा जीव दडपून गेला. एकटया जीवाच्या मागं ही बला लागली. नांगरटीसाठी पैऱ्यानं बैल मागायला म्हातारा रावबाच्या वस्तीवर गेला नि एका उमद्या खोंडानं म्हातान्याला अच्चाद उचलून फेकला. खाली पडलेल्या म्हाताऱ्याला घोळसला. उठूबी दिलं नाही. राववाच्या गड्यानं खोंडाला आवरलं. दाव्याचं तिढं टाकून चारी आळपून भुईला पाडलं तेव्हा खोंडाची रग हटली, नशीब बऱ्यावर नाही तर म्हातारा जगला नसता. हात मोडला, खोक पडली. मुकामार बसला बरगडीन् बरगडी सोलून निघाली होती. साऱ्या पाठीचं पापुद्रं निघालं होतं, दोन लेकी असून म्हातारा जीव वनवासी झाला होता. UNICO 2 + ऊसाच्या ट्रक ड्रायव्हरनं सजाक्काला खबर दिली. कडूस पडा- यच्या वेळेला राजाक्का रावबाच्या वस्तीवर पोचली. राधाक्का तिच्या आधी आली होती. तिच्या घरची गाडी होती. ती भरल्या घरची माल- कीन होती. खटाला मोठा होता. चार जावा-भावांची मनं राखून रहावं लागत होतं; तरी पण राजाक्कासारखं हातावर पोट नव्हतं. दुसऱ्याच्या बांधावरचं कष्ट नव्हतं. राधाक्काचं पोरगं तिच्या सोबत आलं होतं. दोघी बहिणी उरी भेटल्या. मन भरुन आलं. ते पापण्यातून पाझरत राहिलं. ख्याली-खुशाली इचारीत म्हातान्याच्या उशा-पायशाला दोघी बसून राहिल्या. राधाक्काला शेतातल्या कामाची काळजी होती. दोन पोरातील एक तिथंच ठेवलं होतं. त्याची काळजी होती. संग आणलेलं दोन अडीच वर्षाचं पोर सारखं हटून बसत होतं. त्याला गमत नव्हतं. आत्या, काकू, दादा असं म्हणून सारखं फुंदत होतं. हे दे, ते दे, असा हट्ट करीत होतं. राधाक्कानं लई घुटकून घेतलं. शेवटी आस्सी तरासली की त्याच्या पाठीत धपाटा घालून म्हणाली, www (लई जहागिरदार हाइस तर तुझ्या घरी ! हे घर नव्हं तुझं, कायबी मागत सुटलास ते! , FO • तिच्या हातातून राजावकानं पोराला सोडवून घेतलं. आंजारलं- गोंजारलं. कनवटीला पन्नास पैशाचं नाणं हुतं. ते त्याच्या हातावर ठेवलं. त्यानं रडं आवरलं. उसासं टाकत टाकत झोपून गेलं; पण हातातलं नाणं गच्च मुठीत धरुनच झोपलं होतं. मध्यान रातीपर्यंत बहिणी बहि-