पान:लागीर.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ७२ मुका मार घेऊन म्हातारा हालबडला होता. हालत खराब झाली होती. दुखणं वाईटच, पण गरीब-लाचारांचं दुखणं लई वाईट. S राजाक्काचा वाप गरीव लाचार होता. दोन पोरी मार्ग ठेवून देवाघरी गेलेल्या बायकोनंतर त्यानं दुसरा घरोबा केला नाही. एखाद्या विधवा बाईनं जगाला दादा-अप्पा करीत दिवस काढावेत, तसं दोन पोरींना संभाळत त्यानं दिवस काढलं. थोरल्या पोरीच्या लग्नासाठी थोडी शेती होती ती विकावी लागली. राजक्का लग्नाची झाली तेव्हा दोन आखणी घराशिवाय तिच्या बापाकडं काही नव्हतं. घरावर कर्जा- चा बोजा ठेऊन राजाक्काचं लग्न केलं आणि आळा सुटलेल्या पेंढी- सारखा राजाक्काचा वाप काबाडकष्ट करण्यासाठी मुलुखभर फिरु लागला. दोन गाडग्या-मडक्याशिवाय घरात काही नव्हतं. दोन-दोन महिने घराकडं न फिरकताच राजाक्काचा वावा याच्या शिवारातून त्याच्या मळ्यात घाम गाळत राहिला. न घराला झाड-लोट नाही, सारवण-पोतेरा नाही, शाखारणी नाही, डागडुजी नाही.कुत्र्यांनी वस्ती केली, घुशींनी बीळं पाडली. आडं-पाखाडं कोसळू लागलं नि एका जत्रेला घराची दशा बघून मागितल्या किंमतीला राजाक्काच्या बावानं घर फुकून टाकलं. आता गावाकडं फिरकायचं त्याला कारणच उरलं नव्हतं. दोघा-तिघाचं देणं होतं ते दिलं. स्वतःला पैरण-धोतर घेतलं. दोघी लेकींना दोन लुगडी घेऊन दिली. देताना भरल्या गळयानं म्हणाला, 'पोरीनु, आता मन घालायला या बापाजवळं कायबी हायलं नाय. मी साम्रतवान नाय ह्ये घेनात ठिवून प आपापल्या समा- धानानं जगा. 14 त्यानंतर बाबा जिथं काम करायचे तिथंच वस्तीला रहायचे असा नियम झाला. मालक देईल त्या भाजी भाकरीवर दिवस जात होते. कसली कटकट नव्हती, काम नाही, असा दिवस मिळाला तर कधी थोरल्या राधीला तर कधी धाकट्या राजाक्काला म्हातारा येऊन भेटायचा. पोरी आपापल्या संसारात सुखी होत्या. म्हाताऱ्याचं पण बरं चाललं होतं, पण म्हाताऱ्याला बैलानं नि काहीच्या-बाहीच होऊन