ER OFTE , FIR USÍA FASE FIRE BILT is users & STE TEPER THE THE TRIK PIHESTEK IETSPSP TEFSITE TO TTEE FOR DIE HUIS DEPER BEURS PE sp HP 18 19 HE APPÜS SE SPH 115 ७. वस्ती का? fien. Et STES SE TIVE मावळतीकडून काळ्याकुट्ट ढगांची फळी वर सरकली. ऊन माणसाला पलित्यासारखं चटकं देत होतं. रस्त्यावरचा फुफाटा भट्टी- सारखा तापला होता. गाडीवाटेनं राजाक्का झपाट्यानं चालली होती. कुणीतरी पाठलाग करत असल्यासारखी ती घाई-घाईनं चालली होती. लुगड्याचा ओचा पदर तिनं खोवला होता. ऊसतोडीचं दिवस होते, अर्ध्या अर्ध्या मैलावर शिवारात वस्त्या पडलेल्या दिसत होत्या. रस्त्या- वर जरी कोणी नव्हतं तरी वस्त्यांवरील माणसांचा वावर राजाक्काच्या जीवाला आधार वाटत होता. ती नेटानं पावलं टाकीत होती. अंगातून घामाचं पाझर फुटलं होतं. नाकाच्या शेंड्यावरुन, हन- वटीवरुन घामाचं थेंब ठिवकत होतं. भुवईतील घाम डोळ्यात उतरु नये म्हणून ती बोटाने अलगद निरपीत चालली होती. कुंकवाच्या टिकलीत घाम मिसळून त्याचा ओघळ नाकाच्या शेंड्यावर आला होता. कानशिलावरच्या काळ्याभोर केसांचे आकडे घामाने चिप्प होऊन बसले होते. तिला तिच्या बापाची वस्ती गाठायची घाई होती. बाबांच्या काळजीनं तिचं काळीज कुरतडत होतं. त्याच एका धास्तीनं ती लगा- लगा चालली होती. तिच्या बाबांनी नारु पोतराजाजवळ निरोप धाडला होता. देवा- चा भंडारा कपाळावर टेकवीत नारु तिला म्हणाला होता, 'तुझ्या बावानं भेटून जाया सांगितलंय. एकदा जाऊन येतीस 'कसं जाऊ देवा? हिथं रोजानं ऊसतोड ठरलीया, खाडं टाकून
पान:लागीर.pdf/७७
Appearance