2. लागीर ६७ ल्या त्या कृत्याबद्दल त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. वाग- जाईच्या ओढ्यातून जाताना त्याने आपल्या वहाणा काढून हातात घेत- ल्या. ओढचाळील थंडगार पाण्याच्या स्पशनि नेत्याच्या अंगावर थंडीने काटा आला. ओढ्याची डगर चढून तो वरच्या रस्त्याला लागला, तरी त्याच्या अंगावर मघा थंडीने काटा उभा राहिलेला जाईना. उलट आता त्याला थंडी वाजण्याची तीव्र जाणीव होऊ लागली. त्याचे मन साशंक झाले; पण पौष महिन्यात चावरी थंडी असतच. लक्षात येऊन त्या- च्या मनात दिलासा आला. भीमाचे दात थंडीने एकमेकावर आपटू लागले होते. त्या आवा- जाने त्याला त्या झुटिंगाच्या दात करकरा खाण्याची आठवण झाली. - त्याची नजर आपला पाठलाग करतेय, अशी त्याला जाणीव होऊ लागली आणि त्याला चांगलोच हुडहुडी भरल्यासारखे झाले. तो झपा- ट्याने पाऊले उचलू लागला; पण ती पाऊले कोणीतरी अदृश्य शक्तीने ओढल्याप्रमाणे जड वाटू लागली होती. अंगात थोडा ताप असल्याची त्याला जाणीव झाली. भीमाला आंता मात्र कळून चुकले की, आपणास झुटिंग लागला!' आता ही गोष्ट मात्र आपण कोणास सांगण्यात आपली नाचक्की होण्याचा संभव आहे, असा विचार करुन आपण आपल्या ताकदीच्या कैफात ही गोष्ट कोणास सांगू नये म्हणून मनातल्या मनात त्याने बजरंगबलीची शपथ घेतली. त्याला आता मना- पासून असे वाटू लागले की, आपण त्या झुटिंगाशी कुस्ती खेळायला नको होती. तो काही कुस्तीचे नियम पाळायला माणसातला पैलवान निव्हता. बोलून चालून ते पिशाश्च नुसती मानवी शक्ती काढून घेण्या- च्या मागे लागलेले. आपण जर आणखी कुस्ती खेळत राहिलो असतो, तर अगदी आपल्या शरीरातील शक्तीचा शेवटचा झोत संपेपर्यंत तो झुटिंग आपल्याशी खेळतच राहिला असता. आताशी आपली खूपशी शक्ती काढून घेतल्यासारखे भीमाला वाटू लागले. त्याच्या अंगातील ताप खूपच चढलेला असावा. त्याचे हाड नि हाड आता ठणकू लागले होते. गावातील वेशीतून तो आत शिरला. तेव्हा कुत्री भुंकू लागली. (
पान:लागीर.pdf/७४
Appearance