Jump to content

पान:लागीर.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणाला, लागीर ६६ i The TED IF THE SUR 'ए, काय पाहिजे तुला? त्यावर काहीच उत्तर मिळाले नाही; पण राकट थोराड हात भीमापुढं पसरला गेला. भीमाच्या मनात क्षणार्धात विचार चमकून गेला. तो झुटिंग होता आणि तो नेहमीच्या त्याच्या पद्धतीने त्यास चुना मागत होत! एका क्षणाचा विलंब न लावता भीमाने त्याचा पुढे झाले ला हात जोराने खेचला. अगडबंव देहाचा झुटिंगपण या अनपेक्षित हिसक्याने कोलमडला भीमाला साधारण त्याच्या ताकदीचा अंदाज मिळाला; पण झुटिंग तर आता त्याच्या अंगाशी झोंवाझोंबी करु पहात होता. तेव्हा भीमाने शड्डू ठोकून पवित्रा घेतला. त्याला शड्डूनेच प्रत्युत्तर मिळाले. भयंकर विचित्र नजरेचा तो अगडबंब झुटिंग भीमा- वर चाल करुन आला आणि त्या भी चालू झाली. त्या भीषण ण काळोखात यांच झटापट 1: अर्धा तास कोणच कोणास मागे हटत नव्हता; पण नंतर मात्र तो झुटिंग तोंडातून विचित्र आवाज काढू लागला. भीमाने त्याला एकेरी पट काढून आस्मान दाखवायचे ठरवून त्याची घट्ट पकड घेतली; परंतु त्याने तर प्रथमपासून कोणताही कुस्तीचा नियम पाळला नव्हताच; पण भीमाच्या या निर्णायक पवित्र्याच्यावेळी झुटिंगाने भीमाच्या हाता- चा कडकडून चावा घेतला. संतापाच्या भरात भीमाने एक जबरदस्त फटका त्याच्या तोंडावर हाणला. त्याबरोबर एक विलक्षण चित्कार काढून तो झुटिंग जमिनीवर कोसळला. रागाने बेभान झालेला भीमा काही विचार न करता आपल्या रस्त्याने चालू लागला. मात्र चार पाऊले पुढे गेल्यानंतर त्याने बॅटरीच्या फोकसात त्या झुटिंगास पाहिले. तो उठून उभा राहिला होता. रागांने त्याच्या डोळ्याची बुबुळे गरागर फिरत होती. त्यामुळे त्याची ती नजर काळराक्षसासारखी वाटली. तो आपले दात-ओठ खात भीमाकडे पहात होता. भीमाने त्याला एकवार पाहून घेतले व तो पुढे चालू लागला, पण त्याच्या मनातून त्या झुटिंगाची नजर काही केल्या जात नव्हती. आप