लागीर ६५ काही नसता इतक्या रात्री फांदी कशी मोडली? भीमाच्या मनात शंका घर करु लागली; पण तो तसाच चालत होता, मात्र त्याला आता तो हायस्कूलमध्ये असतानाच्या गोष्टी आठवू लागल्या. या वागजाईच्या ओढ्यापासून कड्याच्या ओढ्यापर्यंत म्हणे कोणी झुटिंग अमावस्या- पौर्णिमेला फिरतो नि -- आज अमावस्या आहे! भीमाने तेव मनातून काढण्याचा प्रयत्न केला; पण ते त्यास जमेना. विचार कड्याच्या ओढ्याच्या उंच कपारीवरुन खोल खडकात पूर्वी एका पैलवानाने उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याचा झुटिंग झाला. तो झुटिंग शड्डू ठोकायचा, विहिरीत उड्या घ्यायचा, झाडावरुन उड्या घ्यायचा आणि दिवस मावळल्यानंतर कोणी तडाख्यात सापडला तर त्याच्याशी कुस्ती खेळायचा. भीमा त्या विचाराबरोबरच स्वतःच्या ताकदीचा व मेहनतीचा विचार त्याच्या मनात आला व थोडेसे अस्वस्थ झांलेले मन पुन्हा निर्भय झाले. आज आपण तालुक्याला भारी असा पैलवान म्हणून मिरवतो. आपल्या अंगात हत्तीचे वळ असता तो झुटिंग काय करणार आपणास? तो म्हणे पैलवान होता, तर आपण आहोतच की! आलाच अंगावर तर होऊन जाईल दोघांची! बघूया त्याच्यात किती दम आहे तो! असे विचार मनात रंगू लागताच भीमाची छाती फुगली. तो डौलाने व धीम्या गतीने चालू लागला. वागजाईच्या ओढ्यातून तो वरच्या रस्त्याला आला. तेथून इनामदाराच्या मळ्याची हद्द सुरु झाली होती. ऊसाचा मळा, पेरु-मोसंबीच्या बागा यामुळे तो परीसर एक वेगळेच वातावरण निर्माण करीत होता. येथे रातकिडे किरकिरत नव्हते; पण जवळच्याच लिंबावर घुबड भेसूर घुमत होते. आंब्या- च्या मोहराचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. इनामदारांच्या डेरेदार आंब्याखालून नभीमा MEN आणि - आणि - एक अगडबंब देहाची व्यक्ती त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहात हसत उभी होती. पुढील दोन जाडसर दातातील फट त्या भयानक चेहऱ्याला अधिकच भेसूरता आणीत होती। भीमा प्रथम दोन पाऊले मागे सरकला; पण नंतर धैर्य एकवटून
पान:लागीर.pdf/७२
Appearance