पान:लागीर.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

39 BEI SCHE FIF FOGT SIE FIF TO BE TSTE FIFTFIF TAFT FIFLFF First T ZEIT IST SEIS FIS: 22 1515 HOTSISS THE 15TSLINES THE FIR LE FIS TEFSIT FISIP STEPS IN IPER SPISTE DES ६. लागोरश कालो PETS 1615 FEE TIT SIBT Sir More FFIPPE IS F TEBIPFIF वाटोबाच्या फाट्यावर एस्. टी. थांबली. भीमा खाली उतरला रात्र खूपच झाली होती. भीमाने किल्लीच्या साखळीत अडकविलेल्या मिनी बॅटरीच्या प्रकाशात घड्याळ पाहिले. दीड वाजून गेला होता. एस्. टी निघून गेली तेव्हा भीमा आपल्या आजोळच्या वाटेने चालू लागला. काळोख खूपच होता. मिनी बॅटरीच्या प्रकाशात जेमतेम पायाखालचा रस्ता दिसत होता. प्रकाशसुद्धा फारच मंद वाटत होता. पण बॅटरी होती म्हणून निदान चालता तरी येत होते. एरवी डोळयात बोट घातले तरी दिसणार नाही इतका अंधार दाटला होता. ( नागठाण्याच्या कुस्तीच्या फडावर आलास तर माझ्याकडे वाकडी वाट करुन ये.' असे आजीने सांगितले होते. म्हणून भीमा आज फड जिंकून आजोळी चालला होता. किती तरी दिवसांनी तो आजोळी चालला होता. त्याचे माध्यमिक शिक्षण आजोळीच झाले होते. तेथूनच तो कोल्हापूरला तालमीत सरावाला गेला. तेव्हापासून त्याला आजोळी जाता आले नाही. आजी अशा अपरात्री आपणास पाहून काय म्हणेल? आपण या दोन महिन्यात चारपाच मोठ्या कुस्त्या जिंकल्या, ते ऐकून आजोबांना किती आनंद होईल? याची कल्पना तो मनात रंगवत चालला होता. वागजाईचा ओढा जवळ आला होता. तेथे किर्र 55 झाडी होती. रातकिडे किरकिरत होते. ओढ्याच्या पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. इतक्यात 'कडाड् काड्ऽऽ काड्' असा आवाज झाला व त्या पाठोपाठ 'धप्प' असा उडी घेतल्याचा आवाज झाला. वारा वादळ