लागीर ६० ठरलं. सरपंच हुतं म्हणून तिथं पातूर गाडं गेलं. तेवढ्यावर आमी म्होरं काय तलास लागतूय त्येच्याकडं डोळं लावून बसलो. त्याच वक्ताला गरामपंच्यातीच्या निवडणुका आल्या. सरपंचाचं उपकार नजरेम्होरं धरुन आमी त्येस्नी मतं दिली. आता त्यो गावाचा पैसा खातो का नाय, किती खातो, ह्ये आमास्नी काय कळतंय? कुणीबी आला तरी आमाला सारखाच. नेहमीचीच बोंब ऐकू येतीच. म्हणच हाय 'तळं राखणार त्यो पाणी चाखणार ' त्यात नवं काय हाय ? E पण निवडणुकीत इस्नु सरपंच पडला. दुसऱ्या पार्टीचा म्हादू इनामदार सरपंच झाला. त्येंची पार्टी भारी झाली. पयला सरपंच गावात फिरकनासा झाला. त्येचं काय चालंल आसंबी वाटना, म्हणून आंजीच्या दादानं नव्या सरपंचाची गाठ घेतली. समदं कानावर घातलं, तर त्येनं कानावर हात ठिवलं. म्हणला, AUVI 'मतं देताना इस्न्याच्या कुशीत शिरत हुता. आता माझी सय खिंडीत गावल्यावर झाली व्हय? निवडणुकीचा आर्ज भरायला गाड्या तवा गमजा पून,फटफटत्येंच्या पार्टीसंग उधाळला, तवा वाटली. आता ही गमजा बगा पचतीय का? आंजीच्या तलासासाठी इस्नु सरपंच तालुक्याला नेला हुता जावा त्यो निवडणुकीचा अर्ज भरायला निघाला ह्ये कुणाला ठावं आता उलगडा झाला. मस्तं गयावया केलं, पण त्येला पाना नायच फुटला. शेवटाला. हुती तीच आमच्यातली गरीब लायकीची माणसं पुलीस ठेसनावर गेली. आंजीचा नवरा आला हुता. त्येचं जब-जबाब फौजदार नवा हुता. त्येनं, झालं. तपासाची चक्रं आता फिरु लागली. आता तुमी हेलपाटं घालू नका. काळजी करु नका.' आसं आमच्या माणसास्नी सांगितलं. तिथं आंजीच्या दादासंग जावाय आपणहून बोलला. लई नरमला हुता. त्येंचा गुन्हा आसलं आसं आमच्या माणसास्नी वाटलं नाय. त्यो लगीच त्येच्या ठाण्यावर हाजर हुयाला गेला. आमी शेतीच्या कामा-धंद्यातली माणसं. मोकळादिवस रोजगार घालणारी. फौजदारानं सांगितल्यापर्मानं वाट बगीत हुतो. बाकी लिव-
पान:लागीर.pdf/६७
Appearance