Jump to content

पान:लागीर.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ५९ , 'हो. पण ते आहे कुठं? त्येच्या बापापशीच की. PIN BIN IS V PETE NES 'मग आम्हाला कशाला बोलावलंत? ते पत्र आधी आणा. आता झाली का पंच्यात. सारी आचारी का बिचारी होऊन येका- मेकाच्या तोंडाकडं बघू लागली. तेवढ्यात पांडा म्हणला, 'वाचून दावाय घेतलं त्ये माझ्याच खिशात हायलंय. ह्ये बगा. पत्र समद्या माणसात पुन्ना घडाघडा वाचलं. बयाजवार म्होरं काय करायचं ते ठरलं. पुलीस ठेसनात आर्ज करायचा ठरलं. त्येचं कच्चं टिपान झालं नि माणसं उठायला लागली. जिजीनं पांडाला खुणिवलं. पांडू बापाच्या कानाला लागला. दादानी माणसं थांबीवली. च्या पिऊन जावा' म्हणलं. जिजीनं माझ्यात्न च्याचं सामान नेलं. कांताच्यात्न कपबशा नेल्या. सरपंच म्हणालं, मी चहा घेत नाही. सरपंचास्नी रंजीनं काकीच्या मागच्या दारानं दूध दूध, बाकीच्यास्नी च्या दिला. बैठक उठली. दुसऱ्या दिशी सकाळी आर्ज पक्का लिवला. पुलीस ठेसनावर जायाला कुणाची गाडी मोकळी गावना. शेवटाला भाड्याची गाडी ठरली. सरपंच म्हणलं, नेलं. ४. तापवून आम्ही फटफटीवरनं येतो. त्येंच्या च्या-पान्या आंजीच्या दादानं धा रुपयं दिलं. सरपच नको म्हणलं, पण दादानी खिशात घातलं. आपद्धर्म पाळाय पायजे. आपल्या कामासाठी दुसऱ्याच्या पदराला खार नसावा. माणसं तऋाद गुजरुन आली. तितंबी लई खळखळ झाली. सरपंच हुतं म्हणून वरं, बाकी- च्यांची डाळ शिजली नसती. फौजदार म्हणीत हुता कायनू दिड महिन्यापूर्वी गुन्हा साताऱ्यात घडला तिथंच तक्राद द्या. ( आमच्या हद्दीत गुन्हा घडला नाय. ' सरपंचासंग त्येचं तू-मी झालं. पुन्ना कुठल्याशा पुढान्याची वळख निघाली नि मिटलं. आंजीच्या नवन्याला वारंट काढून बोलवून घ्याचं -