त्यो तिकडं आन् पोरीचा पत्त्या नाय! कुणाला गान्हाणं सांगायचं ? तक्राद कुणाकडं करायची? गुन्हा कुणाचा हाय म्हणून सांगायचं? ह्येच तर कोडं हाय. सासू-सासऱ्याला दोषी धरता येत नाय, नवरा तर आसा कागूद धाडतूया. आता त्येला दोष कसा द्याचा? नि निर्दोष तरी कसा म्हणायचं? अं? बोला की खाशादादा -- ( " लागीर ५८ गड्यानू, दोनी बाजुनी मी कात्रीत आलो. त्यो आंजीचा नवरा माझ्या भनीचं सावतर पोरगं तुमी-आमी एका भावकीच्या बुडक्यातलं. रोज एकमेकाची तोंडं बगायची. पोरीचा तलास लावण्यासाठी कायबी परेत्न करायला तुमच्या पाठीशी मी हाय. पण करायचं काय, जायाचं कुठं, कुणाला इचारायचं, त्यें तुमी ठरवा. मी लग्नात मध्यस्थी केली तशी यातबी मदत करतो. --- तुमचं खरं हाय दादा. तुमी येल मांडवावर चढिवला; पण माणूस खराब लागला. खऱ्या-खोटयाचा उलगडा झाला पायजे. उद्या रंजीच्या लग्नाचा परस्न येणार. आंजीचा तलास लागला नाय तर रंजीच्या लग्नात ही गोष्ट नडणार हाय. व्हय, बायकाची आबरु काचच्या भांड्यावाणी. आवरुची कवाच कुंडलं गडीमाणसाला. वायकाचं लई जपणुकीचं जीणं, काय तरी तलास लागला पायजे. 'आरं, ह्यो बेचा पाढा कुठंवर वाचणार? ह्ये झालं पायजे नि त्ये झालं पायजे. त्येच्यासाठी म्होरंचा इलाज सुचवा की.. मला वाटतं चार तोला- मोलाची माणसं बोलवावीती, त्येंचा इचार घ्यावा. कायदं कानून त्येस्नी ठावं अस्त्याती. मंत्री-पुढाऱ्या त्नी त्येंचा वावर आस्तुया. आशा लोकांच्या कानावर ही गोष्ट जाऊ द्या. झाली. सरपंच म्हणलं, चर्चा सुरु मग तसं ठरलं. सरपंच सेक्रेटरी आसी गावातली पुढारी माणसं आली. जिजीच्या सोप्यात बैठक बसली. 'आशानं आसं ( जावायाचं पत्र आलं म्हणता. कुठाय ते ? त्येच्या बापाला आलंय. '
पान:लागीर.pdf/६५
Appearance