Jump to content

पान:लागीर.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ५६ .' जिजे खुळी का काय ग तू? तू आसी गहिवर घालून बसलीस तर गडीमाणसाला काय करावं ते सुचंल का? आता आशानं आसं म्हणल्यावर चार जाणत्या माणसांचा इचार घ्याला पायजेल का नाय?' जिजी तेवढ्या बोलण्यानं गप झाली. नुसतं नाक-डोळं पुसीत -हायली. वाकीच्याच आया-बाया बोलायला म्होरं झाल्या. आंजी, अश्राप हाय, भांडण काढून निम्म्या वाटत्नं माघारी फिरणारी आडमुठी नाय. आसं हुईल तरी कसं? मी म्हंते. ' आवो, दादा, तुमी आसं करा, खाशादादास्नी संग घिऊन आंजीच्या गावाला जावा. का कावळा शिवला आसला तरी कागूद धाड- त्याली माणसं. 9 ‘व्हय. व्ह्य. ह्येमातूर वगाय पायजे वरं का! कायतरी अ घडल्यालं आसंल बगा. आस्संच 6 CH 'कुणास ठावं. तसं आस्तं तर कार्ड टाकलं आस्तं. ह्यो पाकीटात हातभर कागूद ठिवलाय. तरीबी पर्त्यक्ष जाऊन खातर करा. , आंजीच्या दादाला पटलं.. जायाचं ठरलं. लंगुलग खाशादादास्नी बोलावणं बी गेंलं. तेबी झपाट्यानं आलं.. कागूद वाचून पायला. आणखी दोघं संग घिऊन आजीच्या गावाकडं गाडी चालती झाली. कायबी म्हणा, माझं मनच मला सांगत हुतं, की आंजी अशी सप्नातबी वागणार नाय. तिनं कधी परवास केल्याचं आठवत नाय. शिवारात सोबती बिगर कुठं जायाची नाय. आन् नवन्यासंग आप्रूवायनं निघाल्याली सासरवाशीण निम्म्या रस्त्यात भांडण काढून माघारी कशी फिरलं? तशी ढाणकबी नव्हती. जिजीची समदीच पोरं डोळ्याच्या धाकात. त्यात आंजी थोरली, म्हणून लईच धाकात वागिल्याली. काय केल्या मनाची समजूत पटत नव्हती; पण गेल्याली माणसं माघारी आल्याबिगर खरं काय त्ये कळणार नव्हतं. ते भांगलणीचं दिस हुतं. दिसभर शेतात ताटलेल्या आया-बाया जिजीच्या सोप्यात तारवटल्या डोळ्यानं वसून हुत्या. मध्याह्म कलून गेल्यावर माणसं आली. जोतं चढून म्होरं आलेल्या शिवाच्या तोंडावर