'आता गेल्यासारखी कूसं उजावली- एखादं मुलबाळ झालं की भुईला पाय लागत्याली. ह्या जावयाचा सोभाव मला काय सरळ दिसत नाय, म्हणून एवघा घोर, नाय तर कशाला? लागीर ५५ व्हय ग आज्जे? आता नातीला संग घिऊन गेला तरी जावाय - माझा जीव नाय थाऱ्यावर वया. आताशी सानंबी वंगाळ न्य --- पडत्याती' 'हुं! काय तरी आज्जीचं. शिवार हिरवंगार झालं की समद्यास्नी च सप्नं कसलीबी पडत्याती. ' वाय वाकडाच दिसतो तेवढ्यावर इषय थांबला. त्येच्यावर महिनाबी गेला नसलं. मी चुलीम्होरं हुते. जिजीचं रडणं कानावर आलं काळीजात चरर्र झालं माझ्या. दुधाचं भगुलं तसंच चुलीवर व्हायलं. जिजीचा सोपा गाठला. आया-बाया जमल्या हुत्या. काय झालं म्हणून इचारलं तर आंजीच्या सासन्याचा कागूद आला म्हणून कळलं. खांबाला पाठ दिऊन बसलेल्या दादास्नी मी इचारलं, काय लिवलंय कागदात? आंजीच्या सासऱ्याला सिकंदरावजस्तं का गूद आलाय की, सातार ठेसनापातूर आल्याला आंजीनं भांडण काढून नवयाला माह्येरला जाते म्हणून सांगितलं. त्येची रजा संपल्यानं त्येला माघारी फिरता आलं नाय. त्यो आपल्या ठिकाण्यावर पोचला. आंजी माह्येरला पोचल्याचा कागूद आजून का आला नाय म्हणून त्येनं आई- वाला कागूद धाडलाय. सारं ऐकल्यावर सान्या आंगाला मुंग्या आल्या. आमी एका- मेकीच्या तोंडाकडं बगाय लागलो. जिजीनं जास्तीच गहिवर मांडला- मला काय खरं वाटत नाय माझी आंजी कशी भांडलं? निराळीच भानगड दिसतीया देवा आता मी माझ्या बायला कुठं हुडकू? - वाघानं कुठं सोडली कुणास ठावं आतापातूर गावाची शीव बी तिनं वलांडली नव्हती नि तिच्या नशीबाला काय वनवास वाघानं लावला --- --- --- -
पान:लागीर.pdf/६२
Appearance