• लागीर ५४ नि तुमची लेकबी तिकडं येणार नाय. पोरगं नव्या दाजीच्या धमक्या दबक्या आवाजांत सांगीत हुतं. घटकाभर आमी दुचितच झालो. शेवटाला काकीच म्हणल्या, का घोर लावून घेता उगीच्या उगी? नाय धाडत तर ना धाडू द्या. हिथं कुणाच्या कण कणगी सांडून चालल्याती? तिच्या घरी ती सुखी हाय न्हवं? 1 ( ह्यो बावा किती छळीत आल कुणाला ठावं. माझ्या आंजीला ह काय जीवाला लावू नका जिजी. आवो, जावायाची जात काढू. निघलं तेवढं काढायचं! त्येंचं ध्यान तेवढ्यावरच. भुवयाचं ध्यान कण्या- वर नि बोक्याच ध्यान लोण्यावर. ' पण ह्यो बाबा भेटायचं नाय म्हंतूया. माझ्या आंजीची खुशाली कशी कळायची? माझी बाय लई अश्राप जिजीनं डोळयाला पदर लावला. तशा काकी डाफरुन बोलल्या, ( एs शाने, सुट्टी संपली की जाईल निघून त्यो तिचं सासू-सासरं तुमास्नी आडीवत्याल का? ( नाय बया. त्येस्नी कशाला दोषं लावू ! मग बसा गुमान. त्येची सुट्टी संपस्तवर तिकडं फिरकूच नका मजी झालं. जायाला सवड कुणाला हाय. ते शॅत सोडवून घ्याचं चाललंय. जिजीनं म्हणल्यापर्मानं जीवाचा आटापिटा केला; पण वक्ताला शॅत सोडवून घेणं जमलं नाय. समद्यांचा हिरमुस झाला. पेरणीचं दिसं पाखरासारखं निघून गेलं. पावसाची रिपरिप सुरु झाली, वढ-नालं वाहाया लागलं. घरावाहीर पाऊस तोंड काढू देईना. जरा उघडीप गावली तवा आंजीचं दादा तिला भेटाय गेलं. आतड्याची माया गप कशी वसंल? पण आंजीची गाठ पडलीच नाय. दादा हारकून माघारी आलं. जावयानं आंजीला संग नेली हुती. लांब सिकंदराबाजला आंजी गेली. समद्यास्नी राजा-राणीची गोष्ट ऐकल्यावाणी ग्वॉड वाटलं. गंगा आजी म्हणली,
पान:लागीर.pdf/६१
Appearance