● लागीर ५३ पण आंजे वाळसं तुझ्या यकलीचंच हाय का ? 'चला हाऊं द्या तुमचं कायतरीच बोलायचं. आसं म्हणत आंजी घराकडं पळाली. लई हाका मारल्या पण माघारी कुठली येतीया आमास्नी आक्षी भरुन पावल्यावाणी झालं. आंजीच्या लग्नासाठी दादानं काळजाच्या तुकड्यावाणी शेत सावकारा- कडं टाकलं, ते कारणी लागल्यावाणी झालं. त्या येळला आंजी जाताना पयल्यावाणी उसनून-उसनून रडली नाय, एवढं खरं. कुणाचंबी चांगलं करता करता, देवानं आपलं चांगलं करावं आसं वाटतं. म्होरं दिवाळीला आंजीला आणलं हुतं. लग्नाआधी तिला उन्हा- तान्हात शेतात काम करायला लागायचं. सुगीत रोजानंबी जावं लागा- यचं; पण नांदायला गेल्यापास्न ती सावलीला आली. वाण उजाळला. गाल वरती आलं व्हटाचं डाळींब पिकलं व्हतं. रुपात पयल्यापरास लांब फेर पडला हुता. गोष्टीतल्या राजाच्या राणीवाणी दिसत हुती. एकदा जिजीला म्हणलं, दिष्ट काढं पोरीची. नवं नव्हाळं हाय. आफ दिवाळीला पंधरादी व्हाऊन आंजी गेली. जेष्टात तिचा नवरा दोन महिन्याच्या रजेवर येणार हुता. आमी आमच्या उद्योगात हुतो. ह्येच्या-त्येच्या शेतावर कामाला जात हुतो. आंजीच्या धाकली जिजीसंग रंजीबी येत हुती. त्येंच्यावर परसंग हुता. सावकाराकडचं शेत सोडवायचं हुतं. पेरणीच्या दिसापातूर शेत सोडवायचं जिजीचं धोरण हुतं. त्यात आंजीच्या जाण्या-येण्याचा, मा-माह्यरचा खर्च हुताच. मोजू नाय म्हणलं तरी बुडत्याचा पाय खोलात अशी आंजीच्या माह्यंरची तहा झाली हुती. जिजी सुखावून म्हणली, व्हय बाय. माझ्याबीं मनात तेच येतं. जावाय सुट्टीवर आल्याचं कळल्यावर लहानगा पांडू गाठ घ्यायला जिजीनं धाडला. दादाला सवड नव्हती. पांडूजवळ फराळाचं काय-बाय धाडलं. मोठ्या हुर्पानं गेल्यालं पॉर चिमणीवाणी त्वांड करुन दुसऱ्या दिशी माघारी आलं. त्येच्यासंग सांगावा आला हुता की, आंगठी-घड्याळं आणल्याबिगार तुमी पायरी चढायची नाय 1
पान:लागीर.pdf/६०
Appearance