हालल्यावर जिजीनं सांगितलं, लागीर ५२ ( आंजीला घरात खाया-पियाची ददात नाय. तिथला सुकाळ बगुन तिला माह्यारची हालाखी डोळयाम्होरं येती नि घास गॉड लागत नाय. समदं चांगलं हाय. सवतर सासू अल्लाची गाय हाय. सासरा देव- गुणी हाय. नवराच जरा आडमुठ वाटतो; पण आंजी सगळं जमवून 52515.P , घेतीया. मन भरल्या आडावाणी डबाबलं. लेकीच्या जातीला आणिक काय मागतो आपुन ? त्यायळंला माझ्या वच्छीचबी आसंच नसीब उगड दे रं सिदुबाराया म्हणून मी देवाला हात "जॉडलं. Phonet ला आजीचं दादा जावायाची रजा संपून त्यो जायाच्या त्येला भेटायला गेलं हुतं. पैशाची जुळणी केली. जिजीनं चार लाडू बांधून दिलं संग. तालेवार जावयाला त्यात कसली आप्रूवाय? पण गरीब-नाचारानं रक्तांच्या तेलाचं दिवं ववाळणं भाग पडतं. जावयाला ठेसनावर निरोप दिऊन दादा थेट गावाकडं आलं. मला वाटतंच भेटलं जरा उदास वाटलं. म्हणलं, नव्या जावायाची तन्हा न नव्या येसनीच्या खोंडावाणी आस्ती येईल ताळ्यावर हळुहळु पंचमीला माझेरला आल्याली आंजी चांगली केळीच्या खांवा- वाणी झाली हुती. भरल्या शेंगवाणी टच दिसत होती. पोरी-पोरीत चेष्टा-मस्करी चालली हुती. सांची जेवणं झाल्यावर जिजीसंग माझ्या सोप्यात आली. आणखी दोघी-तिघी आया-बाया हुत्या. आंजीच्या सासरचा इषय निघला. ती बडेजावीनं एक-एक सांगीत हुती; पण रजा संपवून जाताना जावयाने आंजीच्या दादा म्होरं चढाकपणा केला हुता. एक-दोन नादबी हुतं त्याला पण पुर्षाच्या जातीला नाद असायचा. हुईल कमी. दादाचा बाकीच्यानी मातूर मान राखला. समजूत काढली. समदं बेस चाललं हुतं. आंजीला सावतर दीर-ननंदबी माया लावून हुती. नवऱ्याची खुशाली कागदानं कळत हुती. सारं ऐकून घेतल्यावर आतापातूर पेंगत बसल्याली बाळकी म्हणली, आंजे तरीच बाळसं चढलगं तुझ्यावर ! आंजी लाजली. तवर लिलीनं शेंडा हाणलाच,
पान:लागीर.pdf/५९
Appearance