Jump to content

पान:लागीर.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होत्या. त्यांचं अंतःकरण ढवळून निघालं होतं. बालपणीच आई-बाप हिरावून घेणारा देव, पोटासाठी उष्टी खरकटी काढून लोकांच्या दयेवर जगायला लावणारा देव, पापी भाग्य- वंताकडून मातृत्व लादणारा देव! त्या देवाचा ल्यूसीला विसर पडला नव्हता. त्या देवाला ती 'गॉड' म्हणते. आपली मुलगी शोभेल अशा या ल्यूसीला स्वार्थाने, क्रूरतेने आणि वासनेने वरबरटलेल्या जगात उघड्या- वर सोडण्यासाठी आपण चार-सहा दिवस खलबत करुन बेत रचला. आपणास त्या देवाची कधीच आठवण झाली नाही. आयुष्यात आपण एकच दुःख आजपर्यंत मिरवलं वांझपणाचं! पण ते दुःखही आक्कांना आज 'वांझच' आहे, हे पटलं! रेल्वेच्या डब्यात खिडकीजवळ बसलेल्या ल्यूसीला आक्का बजा वत होत्या जीवाला जप, दुनिया पाप्यांची हाय. पुन्हा आशी एखाद्या पापी भाडखाऊच्या नादी लागू नकोस. बच्चा कुणाला देता आला नाय तर सोडता आला तर बग सावधपणानं रहा 'व्हॉट मम्मी ? लागीर ५० ( - --- आन् - आन् न्हाईच कुठं जमलं तर लुसे, लेकराला घेऊन माझ्याकडं ये तू. आपल्या छातीवर हात ठेवून त्या म्हणाल्या; पण गाडीने वेग घेतला होता. ल्यूसीचे अखेरचे शब्द कानी पडले होते, व्हॉट मम्मी ? " ( ('रणरागिणी' दिवाळी अंक- १९८७ )